Truck Car Accident on Devgad-Nandgaon Road esakal
कोकण

Truck Car Accident : तोरस्कर कुटुंबावर काळाचा घाला! अंत्यविधीसाठी जाताना ट्रक-कारच्या धडकेत माय-लेकराचा दुर्दैवी अंत

काळाने तोरस्कर कुटुंबावर घाला घातला.

सकाळ डिजिटल टीम

अपघातात तोरस्कर माय-लेकराचा मृत्यू झाल्याचे कळताच तळेबाजार परिसरात शोककळा पसरली.

देवगड : येथे ट्रक आणि मोटार (Truck Car Accident) यांच्यामध्ये धडक होऊन माय-लेकराचा मृत्यू झाला. अन्य दोघे जखमी झाले. महेश मोहन तोरस्कर (वय ४८) आणि मनीषा मोहन तोरस्कर (७८, दोघे रा. तळेबाजार) अशी मृतांची नावे आहेत.

अपघातानंतर ट्रकने पेट घेतला; मात्र पोलिसांनी (Devgad Police) अग्निशामक बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. देवगड-नांदगाव रस्त्यावर तोरसोळे फाट्याजवळ अपघात झाला. त्यात गुरुनाथ श्रीराम पारकर (५५) आणि श्रध्दा गुरुनाथ पारकर (४५, दोघे रा.तळेबाजार) जखमी झाले.

सहायक पोलिस निरीक्षक हेमंत देवरे यांनी दिलेली माहिती अशी, तोरस्कर आणि पारकर कुटुंबीय मोटारी (एम एच ०७ क्यू ३८५०) तून सकाळी नांदगावच्या दिशेने निघाले होते. संबंधित ट्रक (सीजी १५ डीएफ ९८१६) देवगडच्या दिशेने येत होता. देवगड-नांदगाव रस्त्यावर तोरसोळे फाट्याजवळ दोन्ही वाहनांमध्ये धडक झाली. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. मोटारीतील महेश आणि मनीषा तोरस्कर या माय-लेकराचा मृत्यू झाला.

तळेबाजारवर शोककळा

अपघातात तोरस्कर माय-लेकराचा मृत्यू झाल्याचे कळताच तळेबाजार परिसरात शोककळा पसरली. तोरस्कर यांचे तळेबाजारमध्ये दुकान आहे. पारकर आणि तोरस्कर कुटुंबीय कसाल येथे एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी निघाले होते; मात्र काळाने तोरस्कर कुटुंबावर घाला घातला. महेश तोरस्कर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT