रत्नागिरी - नाणार प्रकल्पाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना शिवसेनेचे शिष्टमंडळ. 
रत्नागिरी - नाणार प्रकल्पाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना शिवसेनेचे शिष्टमंडळ.  
कोकण

सुखथनकर समितीला पाऊल टाकू देणार नाही  - खासदार राऊत

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - नाणार विरोधातील अहवाल मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला. त्याला पूरक निर्णय घेण्याऐवजी सुखथनकर समिती नेमली. आम्ही एवढा कडवा विरोध करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन निर्णय घ्यावा. सुखथनकर समिती म्हणजे बुजगावणे आहे. समितीवर आमचा विश्‍वास नाही. तिला रत्नागिरीच्या वेशीवरही पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला. 

येथील हॉटेल विवेकमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, आमदार राजन साळवी, श्री. मोरे, राजेंद्र महाडिक, विलास चाळके आदी उपस्थित होते. त्यापूर्वी खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी,सभापती, सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेतली.

नाणार प्रकल्पाविरोधातील नेमकी परिस्थिती खासदार राऊत, आमदार राजन साळवी यांनी विषद केली.शासन प्रकल्प रेटणार असेल तर त्यानंतर उद्‌भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दिला.श्री. राऊत म्हणाले,यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. स्थानिकांचा विरोध असल्यास प्रकल्प लादणार नाही, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते.

राजापूर तालुक्‍यातील 8, देवगड तालुक्‍यातील 2 अशा 10 ग्रामपंचायतींनी प्रकल्प रद्द करण्याचे ठराव शासनानला दिले आहेत. 42 हजार 219 खातेदारांनी विरोध दर्शविला आहे. जमिन अधिग्रहण कायदा रद्दची घोषणा करूनही केंद्र शासन त्यावर निर्णय घेण्यास तयार नाही. प्रकल्प रद्द करण्यास पूरक पुरावे देऊनही समिती नेमुन शासनाने लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. 

...तर सरकारचे विसर्जन करू 
एवढा विरोध करूनही शासन नाणार प्रकल्प लादणार असेल तर सरकारचे विसर्जन करू. या बाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील. आम्ही विरोध केला आहे, म्हणून प्रकल्पाच्या कामाला ब्रेक लागला आहे. नाहीतर कधीच कामाला सुरवात झाली असती, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT