mumbai 150 people returning in ratnagiri kokan marathi news 
कोकण

अन् पुणेकर चाकरमानी आल्या पावली परतले...

मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) ः शहरासह ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची दहशत वाढत असल्यामुळे कुंभार्ली घाटमार्गे कोकणात दाखल होणार्‍या चाकरमान्यांना शिरगाव पोलिसांनी प्रवेश नाकारला. त्यामुळे दीडशेहून अधिक चाकरमानी परत निघून गेले. पासधारक केवळ पंधरा जणांनाच प्रवेश देण्यात आला.


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. मुंबई, पुणेसह मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा धोका अधिक असल्यामुळे नोकरी - धंद्यानिमित्त शहरात गेलेले चाकरमानी गावी परतत आहेत. संचारबंदीच्या काळात काम नसल्यामुळे हातावर पोट असलेले लोकही गावाकडे येत आहेत. मात्र जिल्हाबंदी असल्यामुळे अनेकांना येता येत नाही. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाची पोलिसांकडून कडक अमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे जिल्हाच्या सीमेपर्यंत आलेल्या लोकांना पुन्हा आपल्या कर्मभूमीत परतावे लागत आहेत.

बाळहट्ट  लावले धुडकाऊन

पुणे व परिसरात राहणारे चिपळूण, गुहागर, खेड तालुक्यातील दिडशेहून अधिक चाकरमानी आज सकाळी कुंभार्ली घाटात दाखल झाले. तेथील चेकपोस्टवर पोलिसांनी त्यांना अडविले. येणार्‍यांपैकी जर कोणी आजारी असेल किंवा तो कोरोनाचा संशयित असेल तर त्याचा त्रास आरोग्य यंत्रणेसह सर्वांनाच होईल त्यामुळे कुंभार्ली घाटमार्गे येऊ इच्छिणार्‍यांना पोलिसांनी परत पाठविले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे बाळहट्ट पोलिसांनी धुडकाऊन लावले.

चाकरमान्यांना परत पाठवा​

अलोरे - शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक बडेसाहेब नाईकवाडी यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे व उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्याशी चर्चा केली. दोघांनी केवळ पास असलेल्या लोकांना आतमध्ये घ्या बाकींच्या चाकरमान्यांना परत पाठवा अशी सूचना केली. त्यानूसार 15 जणांना प्रवेश देण्यात आला.कुंभार्ली घाटमार्गे जे परवाना धारक लोक आज दाखल झाले त्यांची नोंद घेण्यात आली असून आरोग्य विभागाला त्यांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. घराबाहेर पडू नका अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडून त्यांची वेळोवेळी चाचणी घेतली जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

Sambhaji Maharaj Descendants : शंभूराजांच्या आजोळ घराण्याचे वंशज काय करतात? छत्रपतींशी पिढ्यानपिढ्या जपले आहे रक्ताचे नाते

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

SCROLL FOR NEXT