murder of Gawa in sawantwadi tulas 
कोकण

तुळसमध्ये गव्याच्या हत्येचे गुढ कायम, चार गोळ्या घालून हत्या 

सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ले - तुळस गिऱ्याचे गाळव ते रेवटीवाडी परिसरात गवारेड्याची तब्बल चार गोळ्या घालून हत्या केल्याची घटना काल (ता.24) उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तुळस गिऱ्याचे गाळव ते रेवटीवाडी परिसरात काल (ता.24) गवारेडा मृतावस्थेत आढळला. या घटनेची खबर येथील ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. यावेळी मठ वनपाल चव्हाण यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल वदवी यांनी गवारेड्याचे विच्छेदन केले असता त्याची चार गोळ्या घालून हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती त्यांनी दिली. काही वर्षांपासून सुमारे 8 ते 9 गवारेड्यांचा कळप वाघेरी जंगलात वास्तव्यास आहे. हा कळप मोठ्या प्रमाणात भातशेती व बागायतीची हानी करत होता. या गवारेड्याच्या हत्येमागील गूढ वाढले असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Hotel Fire : साखरझोपेत असतानाच मृत्यूने गाठले ! पहाटे हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

Chhatrapati Sambhajinagar Car Fire: जॅमर लावलेल्या कारला अचानक आग; छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरातील घटनेने खळबळ

झोपेतच घेतला अखेरचा श्वास! बॉलीवूड अभिनेत्रीचं २७ व्या वर्षी निधन, महिन्याभराने कुटुंबाने दिली माहिती

Marathi News Live Updates : कांदिवलीत चार मजली व्यावसायिक इमारतीला आग; ११ जणांची सुखरूप सुटका

१७ ऑगस्ट पंचांग! नागपंचमीसह श्रावणी सोमवार; जाणून घ्या शुभ-अशुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT