कोकण

निवडणूकीत उमेदवारी मागे घ्यायला लागली या रागातून खून

सकाळ वृत्तसेवा

देवरूख ( रत्नागिरी ) - खडीओझरे ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारास थंड पेयातून विष देऊन त्याला ठार मारण्यात आले होते. हा प्रकार 21 डिसेंबर 2017 रोजी घडला होता.  उमेदवारी मागे घ्यायला लागली याचा राग मनात ठेऊन हे कृत्य करण्यात आले आहे. या प्रकरणी देवरूख पोलिसात आज गुन्हा दाखल झाला. प्रयोगशाळेतून अहवाल उशिरा आल्याने गुन्हा दाखल करण्यास एवढे दिवस लागल्याची माहिती देवरूख पोलिसांनी दिली.

तुकाराम आत्माराम हातीम ( 70, मधलीवाडी, खडीओझरे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. तर राजाराम भिवा हातीम (60, हातीमवाडी, खडीओझरे) असे मृत व्यक्तिचे नाव आहे. याबाबत पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार यातील राजाराम हातीम याने 2017 ला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आपल्या वॉर्डमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर तुकाराम यानेही आपला अर्ज दाखल केला होता. यावेळी गावातील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी ग्रामस्थांनी तुकारामची समजुत काढली. गावाच्या आग्रहामुळे तुकारामने आपला अर्ज मागे घेतला. राजाराममुळे आपला अर्ज मागे घ्यावा लागल्याचा सल तुकारामच्या मनात होता. यातून 21 डिसेंबर 2017ला रात्री 8 ते साडेआठ दरम्यान तुकारामने राजाराम याला खडीओझरे हातीमवाडी येथे बोलावून थंड पेयात विष मिसळून पाजले. राजारामच्या मृत्यूमुळे गाव ढवळून निघाला. त्याच्या सहकारी व कुटुंबियांनी या प्रकरणात काहीतरी वेगळे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते.

दोन वर्षांनी शवविच्छेदनाचा अहवाल

यानुसार राजारामचे शवविच्छेदन करून त्याचा व्हिसेरा न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. दोन वर्षांनी याचा अहवाल प्राप्त झाला. राजारामच्या शरीरात विष आढळल्याने या प्रकरणाची उकल झाली. याच अहवालावरून  साखरपा पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय उकार्डे यांनी देवरूख पोलिसात फिर्याद दाखल केली. यावरून तुकाराम आत्माराम हातीम याच्याविरोधात देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते अधिक तपास करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT