new actors in konkan start a new project of divyang in villages of konkan area in ratnagiri 
कोकण

कोकण टाकतंय सिनेसृष्टीच्या दिशेने पाऊल ; स्थानिक कलाकारांसाठी संधी

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : "कोकणातल्या झाकन्या" या वेबमालिकेतून जगभर पोचलेले आणि "ती आमच्या गावाची" मागच्या बेंचवर या वेब मालिकेतून वेगळ्या विषयावर भाष्य करणारे के. झेड प्रॉडक्‍शन व्यावसायिक कलाकृतीच्या निर्मितीकडे वळले आहे. कोकणात स्थानिक कलाकार मिळून कोकणातच सिनेसृष्टी निर्माण करण्याचा मानस असलेल्या या कलाकार मंडळींनी या निमित्तानं एक पाऊल पुढे टाकताना "दिव्यांग" या नव्या कलाकृतीचे चित्रीकरण तालुक्‍यात विविध गावात होणार आहे.

दिव्यांगची गोष्ट ही समाजात असलेल्या लोभी, विकृत आणि स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या मानसिकतेला लख्ख प्रकाशात आणते. पण सजग नागरिक म्हणून जबाबदारी चोख बजावणारेही अजून समाजात आहेत हेही दाखवते. अनेक गूढ रहस्यांनी भरलेली, चकित करणाऱ्या प्रसंगासोबत प्रेक्षकांना बांधून ठेवणारी ही एक थ्रिलर सस्पेन्स कथा आहे. मराठी वेबसिरीजमधील एक उत्तम भय-रहस्य कथा म्हणून निश्‍चितच ठसा उमटवील, असा विश्‍वास कलाकार व तंत्रज्ञ मंडळींना आहे.

दिव्यांग ही नवी कलाकृती नेटफ्लिक्‍स, एस. एक्‍स. प्लेअर यासारख्या कमर्शियल ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी असणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील स्थानिक कलाकार अभिनय आणि तांत्रिक अंग सांभाळत आहेत. रत्नागिरी, जाकादेवी, चवे, आगरनरळ या भागात या वेब मालिकेचे चित्रीकरण होणार आहे. दिव्यांगची पटकथा व दिग्दर्शन प्रदीप शिवगण यांची आहे. सागर कावतकर, किशोर कनोजिया सहाय्य करत आहेत. सचिन सावंत व शुभम वाडकर हे यांचे छायादिग्दर्शक आहेत. तर स्वप्नील जाधव, श्रेया जाधव, दीप्ती वहाळकर, सचिन गावणकर हे प्रॉडक्‍शनचे काम पाहत आहेत.

स्थानिक कलाकारांसाठी संधी

स्थानिक कलाकारांना या क्षेत्रात काम मिळावे, उत्पन्न मिळावं यासाठीच दिव्यांग हे पहिले पाऊल आहे. व्यावसायिक ओटीटीसाठी तयार होणारी ही कोकणातील पहिली वेबसिरीज ठरेल. चित्रीकरणासाठी आधुनिक तंत्र वापरत आहोत. इथेच सिने-नाट्य इंडस्ट्री उभी राहावी, या दिशेने पाऊल असल्याचे प्रदीप शिवगण यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT