new four corona positive patient found in ratnagiri district  
कोकण

ब्रेकिंग - रत्नागिरीत नवीन चार कोरोना रूग्ण, जिल्ह्याची वाटचाल रेडझोनकडे

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात आज दापोली तालुक्यातील शिरधे आणि वणौशी येथील दोघांना व संगमेश्वर तालुक्यातील मुरडव येथील दोन, अशा एकूण चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने ही माहिती दिली.

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 15 झाली आहे. चौघेही मुंबईहून आल्याने संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. मध्यंतरी एक आठवडा जिल्हा कोरोना मुक्त झाल्याने जिल्हावासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सलग रुग्ण सापडल्याने जिल्हा पुन्हा कोरोनाच्या दहशतीखाली आला आहे. जिल्ह्यातील प्रशासन, आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जिल्ह्याची रेड झोनच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने आता कडक पावले उचलण्याची गरज असल्याच्या भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत.       

संगमेश्वर तालुक्यात गेल्या ४ दिवसांत ४ नवे रुग्ण सापडले आहेत. हे चारही जण मुंबईतून संगमेश्वरला आलेले आहेत. दोन दिवसापूर्वी तालुक्यातील पहिला रुग्ण बामणोली गावात सापडला त्यानंतर सोमवारी दुसरा रुग्ण नजीकच्या पुर गावात सापडला. मुरडव गावातील सासू आणि सुनेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दोघेही साडवली येथील क्वॉरंटाइन सेंटरमधे होत्या. त्यांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आज संध्याकाळी त्यांचा रिपोर्ट आला. तो पॉझिटिव्ह असल्याचे समजताच आरोग्य यंत्रणेची एकाच धावपळ उडाली. स्वॅब घेतल्यानंतर या दोघांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले होते. मात्र त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना तात्काळ कोविड रुग्णालयात हलवण्याची तयारी करण्यात आली.  

रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले रुग्ण धरून एकूण संख्या १५ वर गेली आहे. यातील ८ रुग्ण गेल्या ४ दिवसांत सापडले आहेत. यापूर्वी सापडलेल्या ७ पैकी एकाचा मृत्यू झाला तर ६ जण बरे झाले आहेत.

दरम्यान, दापोली तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आता तिनवर पोचली आहे, हे तीनही रुग्ण मुंबई येथून आले होते, यामुळे दापोली तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.  27 एप्रिल रोजी मुंबई येथून काही जण दापोली तालुक्यात येण्यास निघाले होते, ते 28 रोजी मंडणगड येथे पोचल्यावर तेथील तालुका प्रशासनाने त्यांना ताब्यात  घेतले होते व रात्री मंडणगड येथे ठेऊन त्यांना  29 रोजी दापोली तालुका प्रशासनाच्या ताब्यात दिले, या सर्वांना दापोली येथे संस्थात्मक विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते व त्यांचे स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले होते. त्यातील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यातील एक जण तालुक्यातील शिरदे येथील आहे तर दुसरा वणौशी तर्फे पंचनदी येथील आहे. या दोघांपैकी शिरदे येथील तरुणाच्या स्वॅबचा नमुना घेतल्यावर त्याला गावी पाठविण्यात आले होते तर दुसरा तरुण अजूनही संस्थात्मक विलगिकरण कक्षातच आहे. यामुळे प्रशासकीय पातळीवरील गुंतागुंत वाढली असून शिरदे येथील तरुणाला घरी कसे पाठविले यावर शासकीय पातळीवर खल सुरू असून तो आता गावी गेल्यावर किती जणांच्या संपर्कात आहे त्याचा शोध घेतला जात आहे, तर संस्थात्मक विलगिकरण कक्षात या दोघांच्या सोबत कोण होते, त्यांच्या संपर्कात कोण कोण आले याचाही आता शासकीय पातळीवर शोध घेण्याचे काम सुरू आहे. कालच 65 वर्षांच्या मुंबई येथून आलेल्या एका महिलेला तपासणीनंतर कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते, या महिलेसोबत आलेला तिचा मुलगा व सून याना आता रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात काल पाठविण्यात आले होते, आज दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाल्याने दापोलिकारांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. हे दोन जणांना ज्या ठिकाणी संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले होते ती इमारत सील करण्याची शक्यता वर्तवली जात असून आता त्या इमारतीत ज्यांचे विलगिकरण करण्यात आले आहे त्यांना आता कोठे ठेवण्यात आले आहे याची माहिती उपलब्ध झालेली नाही. या सर्व प्रकारामुळे मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांनमुळे  एरवी सेफ झोन असलेल्या दापोलीत आता कोरोना प्रादुर्भाव झालेले असल्याचे मत दापोलीतील नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे, दापोली तालुक्यात दररोज  मुंबईकर येत असून तालुक्यावर आता कोरोनाची टांगती तलवार असून प्रशासन व आरोग्य विभागाचा कसोटीचा काळ सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : राज्यातले सर्व पाणंद रस्ते शेतमालाच्या वाहतुकीसाठी सक्षम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT