nilesh rane criticise on vinayak raut in sindhudurg
nilesh rane criticise on vinayak raut in sindhudurg 
कोकण

'फक्त 56 आमदार आहेत ते...' निलेश राणेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचले

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार विनायक राऊत आणि निलेश राणे यांनी एकमेकांचे पुतळे जाळले होते. यानंतर सिंधुदुर्गमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. आता वातावरण निवळत असतानाच पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्यावर भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. त्यामुळे पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, माझा एक पुतळा जाळला असेल पण विनायक राऊत यांचा पुतळा दहा वेळा जाळला. शिवसेना राणेंच काही बिघडवू शकत नाही. त्यांची तेवढी पात्रता नाही. मी रोज याचा वचपा काढणार, अजून 2024 खूप लांब आहे असा इशाराही राणे यांनी दिला. ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाल्याचा दावा करताना निलेश राणेंनी म्हटलं की, शिवसेनेला ग्रामपंचातय निवडणुकीत भूईसपाट केलं आहे. याचा प्रत्यय आला आहेच. निवडणुकीत 70 पैकी 45 ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच बसले आहेत. आता 2024 पर्यत शिवसेना कुठेही ठेवायची नाही असं आम्ही पक्क ठरवलं आहे.

शिवसेनेची फार मोठी ताकद नाही, त्यांचे फक्त 56 आमदार आहेत. ते घालवायला किती वेळ लागतोय. विधानसभेलासुद्धा भाजप सोबत असल्यानं 56 आमदार निवडून आले, असं म्हणत निलेश राणे यांनी पुन्हा एकदा विनायक राऊत यांना डिवचलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT