Nitesh Rane 
कोकण

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या निर्णय; कोर्टात काय घडलं?

संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

सिंधुदुर्ग : संतोष परब हल्लाप्रकरणी (Santosh Parab attack) आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) सध्या अज्ञातवासात आहेत, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, अटक होण्याची शक्यता असल्यानं त्यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज सुनावणी झाली, मात्र सुनावणी पूर्ण होऊ न शकल्यानं यावर आता उद्या निर्णय होणार आहे. उद्या (बुधवार) दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी या सुनावणीला पुन्हा सुरुवात होईल. (Nitesh Rane prearrest bail will be decided tomorrow What happened in court)

सुरुवातीला फिर्यादी संतोष परब यांचे वकील अॅड. विकास पाटील शिरगावकर यांनी कोर्टात युक्तीवाद केला. याची माहिती देताना ते म्हणाले, "संगनमताचा विषय हा तपासात समोर आला आहे. त्यामुळं फिर्यादीला आरोपीकडून कशाची भीती आहे हे कार्टासमोर मांडण्यात आलं. परब यांच्यावर जो हल्ला झालाय हा जीवघेणा हल्ला आहे. हा प्रकार अपघाताचा नव्हे तर विचारपूर्वक हत्यारानं वार केल्याचा आहे. यामध्ये मुख्य सूत्रधार हे नितेश राणे आहेत हे आम्ही कोर्टापुढे मांडलं. यामुळं भविष्यात संतोष परबवर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं परब कुटुंब भीतीखाली आहे, पण आज धीर दाखवून तो कोर्टापुढे हजर राहिला. सांस्कृतीक महाराष्ट्रात जर एखाद्या आमदारावर अशा प्रकारचे आरोप होत असतील तर त्याचा विचार व्हायला हवा." तसेच केंद्रीय मंत्री जर केंद्रात आमचं सरकार आहे, अशी भाषा वापरत असेल तर ही आम्हाला दिलेली धमकीच आहे असं का समजू नये, असंही ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

दरम्यान, परब यांच्या वकिलांच्या युक्तीवादाला नितेश राणेंचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी उत्तर दिलं. पण त्यानंतर सरकारी वकिलांनी कोर्टात बाजू मांडायला सुरुवात केली. पण कोर्टाचा वेळ संपल्यानं त्यांचा युक्तीवाद पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळं ते उद्या पुन्हा आपली बाजू मांडणार आहेत. कोर्टातील आजच्या एकूण कार्यवाहीबाबत माहिती देताना सरकारी वकील म्हणाले, "अर्जदाराच्या वकिलांचा जो युक्तीवाद केला आम्ही तो काळजीपूर्वक ऐकला. त्यांना काय म्हणायचंय ते समजून घेऊन त्याप्रमाणं त्यांनी जो जो मुद्दा उपस्थित केलाय. त्याला उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणं आम्ही त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. पण आज आमचा युक्तीवाद पूर्ण होऊ शकला नाही. उद्या आमचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर या विषयावर आम्हाला बोलता येईल. कोर्टापुढं आम्ही पोलिसांचा तपास ठेऊ तसेच आम्ही त्यांच्या अर्जाला विरोध करु. त्यानंतर कोर्टासमोर ज्या गोष्टी येतील त्यावर कोर्ट निर्णय देईल"

नितेश राणेंच्या अंतरिम जामिनाची मागणी फेटाळली

युक्तीवादादरम्यान, अॅड. संग्राम देसाई यांनी कोर्टाकडे नितेश राणे यांच्या अंतरिम जामिनाची मागणी केली, पण कोर्टानं त्यांची ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळं आता उद्याच नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन मंजूर होतो की तो फेटाळला जातो यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT