No symptoms but Corona reports positive 
कोकण

धक्कादायक ; लक्षणे नाहीत पण कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड (रत्नागिरी) - मुंबईतून तालुक्यात पाई चालत आलेल्या 11 नागरिकांचे कोरोना तपासणी अहवाल एकाच वेळी  पॉझीटिव्ह आल्याने तालुक्यासह जिह्यात एकच खळबळ उडाली आहे. यात 7 व 9 वर्षे वयाच्या लहान मुलांचा समावेश  असून या सर्वांना कोणतीही लक्षणे नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे चिंता वाढली असून हे सर्व नागरीक मुंबईतील काळबादेवी, गिरगाव, धोबीघाट व कांदीवली परिसरातून आले आहेत. 


पाॅझिटिव्ह अहवाल आलेले हे सर्व पाई चालत आले असताना 7 मे 2020 रोजी तालुक्यातील म्हाप्रळ येथील तपासणी नाक्यात त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांना शहरातील एका विलगीकरण कक्षात कोरंटाईन करुन ठेवण्यात आले होते. 8 मे 2020 रोजी त्यांचे स्वॅब गोळा करुन मिरज येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील पॉजिटीव्ह आलेले नागरीक बहीरवली, चिंचाळी व पालवणी या गावातील आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील आयसोलेशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. मंडणगड तालुक्यात अत्तापर्यंत 187 नागरीकांचे स्वॅब डॉ.आशिष शिरसे यांनी घेत तपासणी करण्यात आली आहे. यात 1 मे रोजी 25,  3 मे रोजी 15, 4 मे रोजी 17, 5 मे रोजी 45, 7 मे रोजी 35 व 9 मे रोजी 50 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. यातील 13 अहवाल पॉझीटीव्ह असून 3 अहवालांमध्ये ऐरर आल्याने ते परत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. उर्वरीत 171 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अहवाल निगेटिव्ह आलेल्या नागरिकांना त्यांच्या गावातील घरी 14 दिवसांसाठी होम कोरंटाईन करून ठेवण्यात आले आहे.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून तालुक्यात अत्तापर्यंत 5375 नागरीक दाखल झाले आहेत. तसेच 10 मे 2020 रोजी म्हाप्रळ क्वारंटाईन सेंटवर मुंबई व पुणे येथून 117 नागरीक पाई चालत येऊन दाखल झाले आहेत. त्यात दापोली तालुक्यातील 15 नागरिकांचा समावेश असून सर्वांचे स्वब घेऊन ते तपासणी पाठवण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार नारायण वेगुर्लेकर यांच्याकडून मिळाली आहे. एस.पी. कॉलेज येथील क्वारंटाईन सेंटरवर 78 नागरीक,   धुत्रोली येथील क्वारंटाईन सेंटरवर 10 नागरीक,  तर म्हाप्रळ येथील क्वारंटाईन सेटंरवर 117 नागरीक,  ग्रामिण रुग्णालय 2 नागरीक क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

Shahi Tukda Recipe: सणासुदीला बनवा लज्जतदार स्वीट डिश; कुरकुरीत ब्रेड अन् केशर-रबडीयुक्त शाही तुकडा!

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

SCROLL FOR NEXT