The obstacles that come with Spray the drug in the village kokan marathi news 
कोकण

गावागावात धुर आणि औषध फवारणीमध्ये येतात हे अडथळे ; ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष..

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये फॉगिंग मशीनद्वारे धुर फवारणीसह अन्य औषध फवारणी केली जात आहे. सद्यस्थितीमध्ये गावांमध्ये कोरोनाच्या चर्चेव्यतिरीक्त अन्य कोणत्याही साथीचा प्रादुर्भाव झालेला नसून केवळ खबरदारी म्हणून ही फवारणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. अनेकवेळा अशा प्रकारची फवारणी गावा-गावांमध्ये पावसाळ्यामध्ये केली जाते.

मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता उन्हाळ्यात करण्याची वेळ आली आहे.पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी साचलेल्या डबक्यांमधील पाण्यातून विविध प्रकारच्या डासांची निर्मिती होते. त्यातून मलेरीया, हिवताप, चिकनगुनिया, डेंग्यू यासारख्या साथींचा प्रादुर्भाव होतो. अनेकदिवस राहणार्‍या या साथींमधून लोकांचे आरोग्य धोक्यात येते.

आरोग्याबाबतचे हे संभाव्य धोके लक्षात घेवून पावसाळ्यामध्ये धुर फवारणीसह प्रतिबंधात्मक औषधांची गावा-गावांमध्ये फवारणी केली जाते. पावसाळ्यामध्ये सर्रासपणे दिसणारी ही औषध फवारणी आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उन्हाळ्यात होताना दिसत आहे. सद्यस्थितीमध्ये तालुक्यामध्ये कोरोना विषाणूच्या चर्चेत असलेल्या प्रादुर्भावाच्या व्यतिरीक्त अन्य कोणतीही साथ पसरलेली नाही. मात्र, विविध प्रकारच्या संभाव्य साथींच्या विषाणूंचा नायनाट व्हावा आदी उद्देशाने धूर फवारणीसह विविध प्रकारच्या औषधांची फवारणी केली जात आहे.

शहरामध्ये नगर पालिकेतर्फे अशी फवारणी केली गेली असून गावा-गावांमध्ये त्या-त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतीकडे फवारणी मशीन उपलब्ध असल्यास त्याच्या सहाय्याने औषध फवारणी केली जात आहे. अशा प्रकारची फवारणी करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना दिले आहेत. त्याप्रमाणे काही गावांमध्ये औषध फवारणी झाल्या असून काही गावांमध्ये सुरू आहेत.        

पावसाळा आणि विविध साथींचा वा रोगांचा फैलाव हे समिकरण गेल्या काही वर्षामध्ये जोडले गेलेले आहे. त्यामुळे चौदावा वित्त आयोगासह विविध योजनांमधून विकासकामांसाठी मिळणार्‍या निधीतून ग्रामपंचायतींनी औषध फवारणी मशीन विकत घ्यावी अशी अपेक्षा मध्यंतरी व्यक्त करण्यात आली होती. तशा प्रकारची चर्चाही पंचायत समितीच्या बैठकीत झाली होती. मात्र, त्याकडे अनेक ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्याचे दिसते. सद्यस्थितीमध्ये तालुक्यामध्ये केवळ दहा-बारा ग्रामपंचायतींकडे धूर फवारणी मशीन उपलब्ध असल्याची बाब पुढे आली आहे. औषध वा धूर फवारणीच्या तोकड्या संख्येमुळे तालुक्यातील सर्वच गावांमध्ये वेळेमध्ये धुर आणि औषध फवारणी करण्यामध्ये अडथळे येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT