One Cores Water Bill Not Fill Ratnagiri Marathi News
One Cores Water Bill Not Fill Ratnagiri Marathi News  
कोकण

रत्नागिरीत कोटीच्या पाणीपट्टीवर पाणी 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - शहरामध्ये सुमारे 40 टक्केच्यावर बेकायदेशीर नळजोडण्या असल्याचा गौप्यस्फोट नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी विशेष सभेत केला. हेच लोक पाणी मिळत नसल्याची ओरड करत असून त्यापैकी अनेकांनी पाणीपट्टी भरली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 40 टक्के लोकांकडून पाणीपट्टी घेतल्यास 1 कोटी 6 हजाराची पाणीपट्टीत भर पडणार आहे. म्हणजे एवढा तोटा पालिका सहन करत असल्याचे यावरून सिद्ध होते. 

या बेकायदेशीर नळ जोडण्यात तोडण्याचे धाडस मात्र सत्ताधारी आणि पालिकेच्या प्रशासनाने दाखविलेले नाही. कारण वारंवार सभागृहात हा विषय होतो आणि तो हवेतच विरतो. राजिवड्यात तर बेकायदेशीर जोडण्यांना ऊत आले आहे. पालिकेच्या मुख्य जलवाहिनी फोडुन बेकायदेशीर पाणी घेतले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र याबाबत पोलिस संरक्षण घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे धाडस होत नाही.

बेकायदेशीर नळ जोडण्याबरोबर अनेक पाणी कनेक्‍शनवर छोटे विद्युत पंपही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाण्याची ओरड सुरू आहे. बेकायदेशीर नळ कनेक्‍शनची यादी देखील पालिकेने तयार केली आहे. मात्र त्यावर पुढे काहीच कार्यवाही वा कारवाई झालेली नाही. सभागृहातही अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाईबाबत निर्णय घेतला जातो. प्रत्यक्षात काहीच होत नाही. 

पालिकेच्या विशेष सभेत दस्तुरखुद्द नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी शहरात 40 टक्के अनधिकृत नळ जोडण्या असल्याचा खुलासा केला. एकूण 22 ते 25 हजार नळ जोडण्या आहेत. त्यांच्याकडून वर्षाला साडे तीन ते चार कोटी पाणीपट्टी वसूल केली जाते. 40 टक्के अनधिकृत नळ जोडण्यांकडुन पाणीपट्टी वसूल केल्यास 1 कोटीच्यावर पालिकेचा महसुल वाढणार आहे. अनधिकृत पाणी जोडण्यांकडे दुर्लक्ष करून पालिका दरवर्षी 1 कोटी रुपयांवर पाणी सोडत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. या सर्वांकडे पालिका सोईस्कर डोळेझाक करीत असल्याचे आता दिसून येत आहे. यावर कठोर कारवाई कधी होणार, असा सवाल आता नागरिक करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT