Konkan Ganeshotsav Electric shock esakal
कोकण

चतुर्थीच्या तोंडावर परब कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर; गणपतीची आरास करताना करंट लागून बस कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू

कोकणात सध्या गणेश चतुर्थीच्या तयारीची लगबग सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

रमाकांत परब हे टेबलवर उभे राहून घरात गणपतीची आरास करत होते.

बांदा : गणपतीची (Ganeshotsav 2023) आरास करताना विजेचा धक्का (Electric Shock) लागून सरमळे-देऊळवाडी येथील एकाचा मृत्यू झाला. रमाकांत शिवराम परब (वय ५०) असे त्यांचे नाव आहे. ही घटना काल (रविवार) सकाळी ९ वाजता घडली.

गणेश चतुर्थीच्या तोंडावरच त्यांच्या अकाली मृत्यूमुळे परब कुटुंबीयांवर (Parab Family) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की कोकणात सध्या गणेश चतुर्थीच्या तयारीची लगबग सुरू आहे. रमाकांत परब हे काल सकाळी घरात गणपतीची आरास करत होते. टेबलवर उभे राहून ते वायरिंग करत होते.

त्यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का लागला. त्यामुळे ते तोल जाऊन खाली कोसळले. त्यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Banda Primary Health Centre) दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी त्यांना मृत घोषित केले. रमाकांत परब हे खासगी आराम बसमध्ये वाहक होते.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी बांदा आरोग्य केंद्रात धाव घेतली. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बांदा आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून तो सायंकाळी उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT