one post man duplicate signature of your dead account holder and money withdraw from post account in ratnagiri 
कोकण

धक्कादायक ; अशी काढली पोस्टमास्तरने मृत व्यक्तींच्या खात्यावरील रक्कम

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या पोस्टातील बचत खात्यात दरमहा शासनाकडून मदत जमा होत असते; मात्र मृत पावलेल्या काही लाभार्थ्यांच्या खात्यातून लाभार्थ्यांच्या बनावट सह्या करून रक्‍कम काढण्याचा पराक्रम दापोली तालुक्‍यातील एका पोस्टमास्तरने केल्याची तक्रार करण्यात आली. याला रत्नागिरी येथील डाकघर अधीक्षकांनी दुजोरा दिला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

दापोली तालुक्‍यातील एका पोस्टमास्तरने संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या पोस्टात असलेल्या बचत खात्यापैकी ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, अशांच्या बचत खात्यातून लाभार्थ्यांची बनावट सही करून पैसे काढले आहेत. मृत पावलेल्या या लाभार्थी खातेदारांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे. रत्नागिरी येथील डाकघर अधीक्षकांकडे या संदर्भात तक्रार केल्यावर रत्नागिरी येथील दोन निरीक्षकांनी या संदर्भात या पोस्टात येऊन चौकशीही केली. या सर्व प्रकारामुळे आता या पोस्ट कार्यालयात खाती असलेल्या या योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात दरमहा शासनाकडून जमा होणारी रक्‍कम काढता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी व आम्हाला आमच्या खात्यातील पैसे मिळावेत, अशी मागणी लाभार्थी करत आहेत. 

या प्रकरणाची चौकशी कूर्म गतीने होत असून, या संदर्भात रत्नागिरीचे डाकघर अधीक्षक यांनी असा प्रकार घडला असल्याचे मान्य केले. संबंधित पोस्टमास्तर रजेवर असल्याचे सांगून या संदर्भात कोणतीही अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार देत, अधिक माहिती गोवा विभागाचे रिजनल ऑफिसर यांच्याकडून घ्या, असे सांगितले; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणी कोणतीही तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल झालेली नसल्याची माहिती दापोलीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार

पोस्टाचे जिल्हास्तरीय अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून या पोस्टमास्तरला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका लाभार्थ्यांनी व्यक्त केल्यावर मुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते विनय जोशी यांनी या प्रकरणाची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे केली. ही तक्रार अधिक चौकशीसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्याकडे पाठविली असल्याचे  जोशी यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Match : वैभव सूर्यवंशी कल्ला करणार, तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली वन डे खेळणार; जाणून घ्या सामना कधी, कुठे, किती वाजता Live पाहता येणार

Roti Lasagna Recipe: पोळी उरली की फेकू नका! बनवा भन्नाट ‘रोटी लजानिया’; चवीला एकदम लाजवाब!

Shimron Hetmyer Smashes 37-Ball Hundred : राजस्थान रॉयल्सने रिलीज केले, गडी पेटला! T10 क्रिकेटमध्ये ठोकले शतक, ९ चौकार अन् ८ षटकारांचा पाऊस...

IND vs NZ 1st Test Day 2 Live: रोहित शर्मानंतर क्रिकेट इतिहासात ग्लेन फिलिप्सने 'अविश्वसनीय' पराक्रम केला; शतक ठोकले, निकोल्ससह अनेक विक्रमही मोडले...

IND vs NZ 1st Test Day 2 Live: ग्लेन फिलिप्सच्या मानेवर चेंडू जोरात आदळला! बॅट फेकली, हेल्मेट फेकलं... भारतीय खेळाडूने टशनने पाहिलं; जबरदस्त ड्रामा

SCROLL FOR NEXT