One of the two suspects was released at home in khed kokan marathi news 
कोकण

खेड मधिल दोन संशयितांपैकी एकाला सोडले अन्.....

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : कोरोना रोगाचे संशयित म्हणून येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोघांपैकी एकाच्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. मात्र, दुसऱ्या संशयित रुग्णाच्या काही चाचण्या अद्याप बाकी असल्याने त्या 
रुग्णाला विशेष वाॅर्डमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गरूड यांनी दिली.

लोटे पंचक्रोशीतील सुमारे ५० जण २६ फेब्रुवारी रोजी नेपाळ येथे फिरण्यासाठी गेले होते. ६ मार्चला हे सारे नेपाळहून लोटे येथे परत आले. ९ मार्चला यापैकी दोघांना सर्दी खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने दोघांवर लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करून कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

दोन संशयितांपैकी एकाला सोडले घरी

सध्या जगभरात कोरोनाची असलेली दहशत आणि नेपाळ सहलीवरून परतल्यावर दोघांना सर्दी खोकल्याचा सुरु झालेला त्रास यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या दोघांनाही कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या खास वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या नमुन्यांपैकी पुरुष रुग्णाच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या रुग्णाला शुक्रवारी रात्री उशिरा घरी सोडण्यात आले.

 महिला रुग्णाच्या चाचण्या बाकी

मात्र, यातील महिला रुग्णाच्या काही चाचण्या अद्याप बाकी असल्याने तिला अद्याप कळंबणी येथील उप जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विशेष निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. नेपाळ येथे सहलीला गेलेल्या अन्य ४८ जणांचीही रत्नागिरी येथून आलेल्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने तपासणी केली; मात्र या ४८ जणांमध्ये कोरोना रोगाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याने खेडमध्ये कोरोना आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT