Employees Credit Union Election
Employees Credit Union Election sakal
कोकण

Sindhudurg : राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेसाठी चुरस

सकाळ वृत्तसेवा

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्था निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. एकूण ३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १५ जागांसाठी ३७ अर्ज आल्याने यावर्षी राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्था निवडणुकीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांतील वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १७ जूनपासून यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. २३ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या कालावधीत एकूण ३७ अर्ज दाखल झाले आहेत. १५ जागांसाठी ३७ अर्ज आल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. उद्या (ता. २४) अर्ज छाननी होणार आहे.

११ जुलै रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ठेवण्यात आला आहे. गरज पडल्यास २४ जुलैला मतदान घेण्यात येणार असून, २५ रोजी मतमोजणी होणार आहे. या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २०८० एवढे मतदार निश्चित झाले आहेत. एकूण १५ संचालक निवडून द्यायचे असून, एक जिल्हा मतदार संघ, आठ तालुका मतदार संघ, एक मुख्यालय मतदार संघ, तर पाच राखीव मतदार संघ आहेत.

राखीव मतदारसंघात दोन महिला राखीव, एक इतर मागास प्रवर्ग, एक अनुसूचित जाती किंवा जमाती, एक भटक्या विमुक्त जाती व जमाती व विशेष मागास प्रवर्ग यासाठी जागा राखीव आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेसाठी एकूण ३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या या अर्जांची छाननी होणार आहे. ११ जुलै रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. या दिवशी निवडणुकीबाबत स्पष्टता होईल.

- यू. यू. यादव, निवडणूक निर्णय अधिकारी तथा कार्यालयीन अधीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT