pangolin smuggling in khed six person arrested by police ratnagiri 
कोकण

कोकण : खवले मांजराची तस्करी; सहाजणांना अटक, खेडमधील घटना

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : खवले मांजराची तस्करी करणाऱ्या सहा जणांच्या शिकारी टोळक्‍याला वनविभागाने सापळा रचून एका जिवंत खवले मांजरासह पकडले. ही घटना दुपारी खेड रेल्वे स्टेशनजवळील साई ढाब्याजवळ घडली. या अट्टल शिकारींना पकडण्यासाठी मुख्य वनसंरक्षक डॉ. क्‍लेमेंट बेन यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, विभागीय वनअधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख, वनक्षेत्रपाल आर. आर. पाटील यांनी सापळा रचला होता. सापळ्यात दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 

चार जण एका चारचाकी गाडीतून खेड रेल्वे स्टेशनजवळ आले. त्यांच्याजवळ मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोत्यामध्ये जिवंत खवले मांजर असल्याचे समजले होते. त्यानुसार खवले मांजर असल्याची कात्री झाल्यावर तत्काळ चारचाकी गाडीवर झटापट करून गाडीतच पकडण्यात आले. अन्य दोघांना जवळपासच्या ठिकाणातून ताब्यात घेण्यात आले. याबाबत २६ मार्चला रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी खवले मांजरांची तस्करी रोखण्यासाठी वनविभाग, तसेच पोलिसांना समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या होत्या. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक हेमंत शहा व पोलिसांनी वनविभागाला चांगले सहकार्य केले.

पकलेल्या आरोपींची नावे अशी. महेश विजय शिंदे (खेड), उद्धव नाना साठे (रा. ठाणे), अंकुश रामचंद्र मोरे (रा. पोखळवणे, ता. दापोली), समीर सुबाष मोरे (रा. पोखळवणे, ता. दापोली), अरुण लक्ष्मण सावंत (रा. ठाणे), अभिजित भार्गव सागावकर (रा. सुकीवली, ता. खेड). खवले मांजर एक दुर्मिळ सस्तन प्राण्याची प्रजाती असून वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत या प्राण्याला वाघाएवढेच संरक्षण दिले आहे. जगात वाघाच्या खालोखाल सर्वात जास्त तस्करी या खवले मांजराचीच होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC World Cup: महिला विश्वविजेत्यांचा ‘डायमंड’ सन्मान! हिरे आणि सौर उर्जेची दुहेरी भेट; उद्योगपती आणि खासदारांकडून खास गिफ्ट

DAYA DONGRE DIED: एका युगाचा अंत! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन; प्रेक्षकांची खट्याळ सासू हरपली

Dhule News : गुलाबी थंडीची वाट, पण 'पर्जन्यराजा' थांबायला तयार नाही! धुळ्यात नोव्हेंबरमध्येही पावसाळी वातावरण, नागरिक हैराण

Women's World Cup: भारतीय खेळाडूच्या आजीला आलेला हार्टअॅटॅक, पण वर्ल्ड कपसाठी कुटुंबाने घेतलेला मोठा निर्णय

Mumbai News: मुंबई सेंट्रल एसटी स्थानक राज्यात अव्वल; स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ उपक्रमात मानाचा तुरा

SCROLL FOR NEXT