खोपोली नगरपालिका 
कोकण

खोपोलीच्या विकासाची गाडी रुळावर; दिवाळीनंतर कामांना मिळणार गती

अनिल पाटील

खोपोली : कोरोना संकट, लॉकडाऊन व निधीची कमतरता यामुळे मागील सात महिने खोपोली शहरातील विकासकामांना ब्रेक लागला आहे. मात्र, दिवाळीनंतर प्रलंबित सर्व विकासकामांना गती देण्यासाठीचे नियोजन करण्यात आल्याने आगामी काळात खोपोली शहराची विकासाची गाडी रुळावर येणार आहे. 

खोपोली शहरातील विविध विकासकामे लॉकडाऊन आणि निधीअभावी रखडलेली आहेत. मात्र, या कामांना दिवाळीनंतर गती मिळणार आहे. या विकासकामांमध्ये रखडलेल्या प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी जवळपास 22 कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारून परिसर सुशोभीकरण, छत्रपती शाहू महाराज सभागृह डागडुजी व दुरुस्तीसाठी 10 कोटी, अंतर्गत 16 रस्त्यांसाठी पाच कोटी, कचरा डम्पिंग यार्ड सुशोभीकरण, आधुनिक दिवाबत्तीसह प्रत्येक नगरसेवकांसाठी त्या-त्या वार्डमधील विकासकामांसाठी 20 लाख निधी उपलब्ध होणार आहेत. 

एमएमआरडीएकडून मंजूर असलेला साडेनऊ कोटींचा निधी, आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून साडेपाच कोटींचा निधी लवकरच नगरपालिका तिजोरीत उपलब्ध होणार आहे. यातून रखडलेली विकासकामे पुढील चार-पाच महिन्यांत पूर्णत्वास येतील, असा विश्वास नगराध्यक्ष सुमन औसरमल, उप नगराध्यक्ष विनिता कांबळे व मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे स्वच्छता सर्वेक्षण अभियानासाठीची तयारी व नियोजनही करण्यात आले आहे. 

प्रस्तावित विविध विकासकामे, रस्त्यांची कामे दर्जेदार होतील, यासाठी काटेकोर नियोजन होण्याची आवश्‍यकता असल्याचा आग्रह नगरसेवकांनी केला आहे. तसेच ही कामे करताना जनतेच्या मागण्या, दैनंदिन अत्यावश्‍यक सुविधांना प्राथमिकता मिळावी, यासाठी येथील स्थानिक सामाजिक संस्थाही जाग्या झाल्या आहेत. 

दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणावर विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. यात शहरातील रस्ते, उद्यान दुरुस्ती व डागडुजी; तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारण्याच्या कामांना प्राथमिकता देण्यात आली आहे. 
- सुमन औसरमल, नगराध्यक्ष 


(संपादन : उमा शिंदे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी; ५ ते ६ किमीपर्यंत रांग

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT