दिवाळी फराळाला कोरोनाचे चटके 
कोकण

दिवाळी फराळाला कोरोनाचे चटके; खाद्यतेलाचे भाव 30 टक्‍क्‍यांनी वधारले

प्रणाली कुऱ्हाडे

नेरूळ : दिवाळी म्हटली की फराळांची मेजवानी असतेच. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने रेडीमेड फराळाऐवजी गृहिणी घरच्या फराळांना प्राधान्य देत आहेत. मात्र, खाद्यपदार्थांचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत 30 टक्‍क्‍यांनी वधारल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलाव्यतिरिक्त बेसनाचे भावही वाढल्यामुळे यंदा बेसनाचे लाडू करणाऱ्यांना खिशाला कात्री लावावी लागणार आहे. परंतु, फराळासाठी लागणाऱ्या रवा, मैदा, साखर आदी पदार्थांचे भाव मात्र स्थिर असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे बाहेरील खाद्यपदार्थ खरेदी खाण्यास भीती वाटत असल्याने त्याचा फटका रेडीमेड फराळ व्यवसायाला बसला आहे. 

इतर सणांप्रमाणे दिवाळीवरही कोरोनाचे सावट आहे. तरी नागरिक दिवाळीच्या तयारीला लागले आहेत. घराघरांतून फराळ तयार करण्याचा सुगंध दरवळत आहे. यंदा डाळी, डालडा, रवा आणि मैदा यांसारख्या फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या दरात फारशी भाववाढ झालेली नाही. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला असला, तरी फराळासाठी आवश्‍यक असणाऱ्या खाद्यतेलाच्या किमती मात्र वाढल्या आहेत. यामुळे गृहिणींना काही प्रमाणात झळ सोसावी लागणार आहे. शंकरपाळी, करंजी, चकली आणि चिवडा तळण्यासाठी आर्थिक परिस्थितीनुसार पामतेल, सूर्यफुल तेल, सोयाबीन तेल आणि धान्यतेलाचा वापर केला जातो. मात्र, या सर्व खाद्यतेलाचे भाव गेल्यावर्षीच्या तुलनेत 30 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. त्यामुळे खाद्यतेल गरम करण्याआधीच तापले आहे. 

सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असले, तरी घराबाहेरून तयार खाद्यपदार्थ खाताना आपल्याला कोरोना तर होणार नाही ना, अशी भीती नागरिकांच्या मनात गेली नाही. त्यामुळे दुसऱ्याने तयार केलेल्या पदार्थांऐवजी सध्या वर्कफ्रॉम होममुळे घरी असलेल्या नोकरदार महिलांकडून मिळालेला वेळ फराळ तयार करण्यास सत्कारणी लावला जात आहे. 

पदार्थांचे दर (प्रति किलो रुपयांत) 
               2020           2019 
रवा             30               32 
मैदा           25               26 
साखर        37               37 
पोहा          42 ते 50     42 ते 50 
भाजणी       65 ते 70     60 ते 65 
चणाडाळ    70 ते 80     60 ते 70 

बेसनाचे लाडू झाले 'कडू' 
दिवाळीनिमित्ताने तयार केल्या जाणाऱ्या फराळामध्ये बेसनाचे लाडू असतातच. परंतु, यावर्षी चणाडाळ महागल्याने त्यापासून तयार होणाऱ्या बेसनावरही परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी 60 ते 70 रुपये प्रति किलो दराने मिळणारी चणाडाळ यावर्षी 70 ते 80 रुपयांवर गेल्याने बेसनाचे गोड लाडू यंदा कडू होण्याची शक्‍यता आहे. 

कोरोनाचा फटका आमच्या व्यवसायालाही बसला आहे. चकली, बेसनाचे लाडू, शंकरपाळी, चिवडा असे दिवाळी पदार्थांची विक्री करतो. दरवर्षीपेक्षा यंदा 80 टक्के व्यवसाय घसरला आहे. फक्त 10 ते 20 टक्के ऑर्डर्स मिळाल्या आहेत. अशा परिस्थितीत खाद्यतेल महागल्याने फराळ तयार करणे परवडत नाही. 
- कल्पना संजय कदम, जुईनगर, फराळ विक्रेते 

फराळाला लागणाऱ्या साहित्यांचे दर दिवाळी येताच वाढले आहे. या अनुषंगाने आमच्यासारखे सामान्य ग्राहक आता किलो किलोंमध्ये बनवणारी दिवाळी आता महागाईमुळे कमी बनवू. प्रकाशाची दिवाळी या वर्षी आम्हा सामान्य नागरिकांवर महागाईचे सावट घेऊन आले आहे. 
- सुरेखा केदारे, जुईनगर ग्राहक 

(संपादन : उमा शिंदे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT