person in contact with the corona constraint death in ratnagiri kokan marathi news 
कोकण

फक्त सोबतीने 'त्याला' ठरविले कोरोनाबाधीत अन् केले असे अंत्यसंस्कार...

सकाळ वृतसेवा

राजापूर  (रत्नागिरी) : मंगलोर एक्सप्रेस मधून आलेल्या कोरोना बाधिताच्या संपर्कातील व्यक्तीचा शुक्रवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या मृत व्यक्तीला काही काळ होम क्वारेंटाइन करण्यात आले होते.  त्याच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती असे असतानाही या व्यक्तीचे अंत्यसंस्कार कोरोना बाधित मृत व्यक्तीवरील अंत्यसंस्काराप्रमाणे करण्यात येणार असल्याची माहिती राजापूरचे प्रांताधिकारी प्रवीण खाडे यांनी दिली.

 अनेकांना केले होते होम क्वारेंटाइन पण

मंगलोर एक्सप्रेस मधून आलेल्या एका प्रवाशाला कोरोना झाल्याचे काही दिवसांपूर्वी निष्पन्न झाले होते. त्याच्यावर सिंधुदुर्ग येथे उपचार करण्यात आले. दरम्यान हा रुग्ण ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आला होता त्या लोकांना होम क्वारेंटाइन करण्यात आले होते. ही मंगलोर एक्सप्रेस मधील व्यक्ती काही कालावधीसाठी खारेपाटण येथील आरोग्य केंद्रात गेल्याचे तपासणीत पुढे आले होते. त्यावेळी तिथे असलेल्या लोकांना राजापूर प्रशासनाने होम क्वारेंटाइन केले होते.

अशा होम क्वारेंटाइन केलेल्या व्यक्तींमध्ये मोसम (ता राजापूर) येथील व्यक्तीचा समावेश होता. या व्यक्तीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्याची तब्येत बिघडल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या मोसम मधील व्यक्तीचा शुक्रवारी रुग्णालयात मृत्यू झाला.या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण हे कोरोनाशी संबंधित नाही. तरीही ही व्यक्ती काही काळ होम क्वारेंटाइन होती. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांच्यावर कोविड 19 बधितांवर ज्या प्रमाणे अंत्यसंसकर केले जातात त्या प्रमाणे केले जातील अशी माहिती श्री खाडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

Jaripatka Police Inspector Transfer : लाचलुचपत प्रकरण अंगलट; जरीपटका पोलिस निरीक्षकाची बदली

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT