police Testimonial frame with photo of 300 people ratnagiri 
कोकण

रत्नागिरीत कोविड योद्धा पोलिस कर्मचार्‍यांच्या पाठिवर शाबासकीची थाप...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी :कोरोना बाधित क्षेत्रात कोविड योद्धे म्हणून लढणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांचे जिल्हा प्रशासनाने मनोधर्य उंचवाण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे. पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण  मुंढे यांच्या संकल्पनेतून पोलीस कर्मचार्‍यांचा फोटो असलेल्या प्रशस्तीपत्रकाची फ्रेम देवून कर्मचार्‍यांचा गौरव करून त्यांच्या पाठिवर शबासकीची थाप मारण्यात आली. राज्यात प्रथमच रत्नागिरीत हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील 300 कर्मचार्‍यांचा गौरविण्यात येणार असल्याचे, पोलिस अधिक्षक डॉ. मुंढे यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये कोरोना बाधितांचे संख्या आता 108 पर्यंत पोहचली  आहे. या कालावधीत अनेकजण हे संस्थात्मक क्वारंटाईन असल्यामुळे पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेवावा लागत आहे. जिल्ह्यात 14 पेक्षा अधिक कोरोना प्रतिबंधित क्षेत्र असल्याने या ठिकाणी 24 तास पोलिस  बंदोबस्त आहे. अशा ठिकाणी अनेकांच्या संपर्कात पोलिस कर्मचारी येत आहे. तरी राष्ट्रीय आपत्तीपुढे हा लढवय्या  उभा आहे. या लढाईत त्याचे खच्चीकरण होऊ नये, नव्या उमेदीने पुन्हा आपले कर्तव्य बजावावे, मनोधर्य वाढावे यासाठी जिल्हा पोलिस दलाने हा अनोखा उपक्रम राबविला आहे.

रत्नागिरी पहीला जिल्हा ; 300जणाना फोटोसह प्रशस्तीपत्रकाची फ्रेम​

पोलिस अधीक्षकांच्या हस्ते अशा कोविड योद्धांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आहे. पोलिस कर्मचार्‍यांचा फोटो असलेले प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे,  अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी कल्पना अमलात आणली. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र बंदोबस्त ठिकाणी पोलिसांना जाऊन देण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधिक्षक आयूब खान, पोलिस निरिक्षक शिरिष सासने, अनिल लाड आदी अधिकारी उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT