नवी मुंबई पोलिस आयुक्तालय 
कोकण

नवी मुंबईत गुन्हे शाखेसाठी नव्या पदाची निर्मिती; अपर पोलिस आयुक्तपदी डॉ. शेखर यांची नियुक्ती

विक्रम गायकवाड

नवी मुंबई : उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांच्या बुधवारी झालेल्या बदल्यांमध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पदाची नव्याने निर्मिती करण्यात आली. या पदासाठी गृह विभागाने राज्य राखीव पोलिस बल, मुंबई येथे पोलिस उपमहानिरीक्षकपदी कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी डॉ. बी. जी. शेखर यांची नियुक्ती केली आहे. या पदाची निर्मिती करताना सरकारने पोलिस उपआयुक्त (मुख्यालय-प्रशासन) लोहमार्ग-मुंबई हे पद नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात वर्ग केले आहे. 

सरकारने केलेल्या अन्य बदल्यांमध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेचे पोलिस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांची परिमंडळ-1 चे पोलिस उपआयुक्त म्हणून, तर पोलिस उपआयुक्त (मुख्यालय) शिवराज पाटील यांची परिमंडळ-2 चे पोलिस उपआयुक्त म्हणून नव्याने नियुक्ती केली आहे. परिमंडळ-1चे पोलिस उपआयुक्त पंकज डहाणे यांची बदली महाराष्ट्र राज्य पोलिस नियंत्रण कक्ष येथे पोलिस अधीक्षक म्हणून केली आहे. तर परिमंडळ-2चे पोलिस उपआयुक्त अशोक दुधे यांचीही बदली झाली असून, ते नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. 

दरम्यान, नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात गुन्हे शाखेसाठी आता नव्याने पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने आयुक्तालयाला आणखी एक आयपीएस पोलिस अधिकारी लाभला आहे. आता नवी मुंबईत गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून पोलिस उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याऐवजी अपर पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी कामकाज पाहणार आहेत. 

चार सहायक पोलिस आयुक्तांची नियुक्ती 
सरकारने बदल्या केलेल्या राज्यातील 105 पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांपैकी चार अधिकाऱ्यांची नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात सहायक पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये उस्मानाबाद येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे पोलिस उपअधीक्षक सचिन सावंत, जळगावमधील भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, पालघरमधील जव्हारचे उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनावणे, अमरावती शहरचे सहायक पोलिस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांची नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात सहायक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. यासोबतच नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) राजेंद्र चव्हाण यांची मुंबई शहर येथे बदली केली आहे.  

 
(संपादन : उमा शिंदे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''..तर अजितदादांनी आम्हांला तसं सांगितलं असतं'', दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Solapur News: रखडलेल्या बसवेश्वर पुतळ्यासाठी २४ संघटना एकवटल्या; भरघोस निधी असतानाही प्रत्यक्ष काम न झाल्याने कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!

MSME Budget 2026: निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पातून ट्रम्प यांना खणखणीत उत्तर; एमएसएमईच्या बळकटीकरणामुळे युरोपीय बाजारपेठेत भारताचा दबदबा!

Pune Dirty City Controversy : पुणे घाणेरडे शहर, बिल गेट्सच्या माजी सल्लागाराने व्यक्त केलेला तिरस्कार, एपस्टीन फाइल्समध्ये धक्कादायक खुलासा

लग्नानंतर 14 वर्षांनी सुपरस्टार अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म

SCROLL FOR NEXT