कोकण

कोकणात प्रतीकात्मक शिल्पे वेधताहेत लक्ष; सिंधुदुर्गात 54 ठिकाणी उभारणार वास्तुशिल्प

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ‘चांदा ते बांदा’ योजना राबवली होती

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीसाठी (increse tourism) ‘चांदा ते बांदा’ योजनेतून (chanda to banda policy) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून जिल्ह्यात (maharashtra tourism) पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर गडकिल्ले प्रतिकृती, ऐतिहासिक वारसा असलेली प्रतीकात्मक शिल्पे उभारली असून, ही शिल्पे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

युती सरकारच्या काळात चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ‘चांदा ते बांदा’ योजना राबवली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर (dipak kesarakar) यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीसाठी विविध योजना मंजूर झाल्या होत्या. त्यासाठी विशिष्ट समितीची नियुक्ती केली होती. समितीच्या अध्यक्षस्थानी केसरकर होते. सद्यस्थितीत ही योजना बंद असली तरी त्यावेळी मंजूर योजनांची कामे करण्यात येत आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ५० पेक्षा जास्त ठिकाणी पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर अशा प्रतीकात्मक वास्तू शिल्पांची उभारणी पर्यटन विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी जवळपास दीड कोटीचा निधी मंजूर केला असून समितीच्या विचारसरणीतून आणि संकल्पनेतून या शिल्पांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सावंतवाडीची लाकडी खेळणी, गडकिल्ले, बंदर जेटी, धबधबे आदी पर्यटनस्थळांचा समावेश आहे. तसेच दिशादर्शक, किलोमीटरची माहिती सांगणारे फलकही उभारले आहेत. हे शिल्प उभारताना गडकिल्ल्यांसाठी ढाल, तलवार, बंदर जेटीसाठी अँकर, अशी संकल्पना आहे.

"केसरकर पालकमंत्री असताना या कामांना मंजुरी मिळाली होती. गतवर्षी कोरोनामुळे हे काम थांबले; मात्र आता ते मार्गी लावण्यात येत आहे. जवळपास ५४ ठिकाणी असे वास्तुशिल्प उभारण्यात येणार अहे. जवळपास २७ ठिकाणी सद्यस्थितीत उभारले आहेत. पर्यटनवृद्धीसाठी याचा फायदा होणार अहे. पर्यटकांना पर्यटनस्थळाकडे जाण्यासही सोपे होणार आहे."

- संजय कल्पे, अधिकारी, पर्यटन विकास महामंडळ, सिंधुदुर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात वाहतुकीची प्रचंड कोंडी; पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक

Eighth Pay Commission: केंद्र आठवा वेतन आयोग कधी लागू करणार? मोठी अपडेट आली समोर, सरकारची योजना काय? वाचा...

Post-Diwali Heart Care Tips: दिवाळीनंतर हृदयाचं आरोग्य जपा! तज्ज्ञांकडून जाणून घ्या खास टिप्स

INDW vs NZW: स्मृती मानधनापाठोपाठ प्रतिका रावलचंही न्यूझीलंडविरुद्ध खणखणीत शतक! वर्ल्ड रेकॉर्ड्ससह रचली ८ मोठे विक्रम

Bidkin News : देशसेवा आणि समाजसेवेला वाहिलेले जीवन संपले! नारायण लघाने यांच्या निधनाने गावात शोककळा

SCROLL FOR NEXT