Possibility of action unless GI hapus mango kokan marathi news 
कोकण

आता हापूस ओळखणे झाले सोपे ...कसे ते वाचा..

सकाळ वृत्तसेवा

देवगड (सिंधुदुर्ग) :  "हापूस'च्या नावाखाली अन्य राज्यातील आंबा विक्रीस प्रतिबंध करण्याबरोबरच येथील हापूस विक्रीसाठी आता "जी.आय. मानांकन' अनिवार्य आहे. प्रमाणपत्र नसल्यास संबधितावर कारवाई प्रस्तावित होऊ शकते. यासाठी हापूस आंबा उत्पादक, शेतकरी, विक्रेते, अडते, पुरवठादार, निर्यातदार, किरकोळ विक्रेते, पॅकींग साहित्य उत्पादक, प्रक्रीया उद्योजक आणि रोपवाटिकाधारक (नर्सरी) यांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबतची माहिती आणि सहकार्य संस्थेकडून करण्यात येणार आहे. 

"हापूस' कोकणातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेले पीक आहे. याची विक्री करताना जी.आय. नोंदणी सर्टिफिकेशन (भौगोलिक निर्देशन) असणे आवश्‍यक आहे. हापूस आंब्याशी संबधित सर्वच व्यवसायिकांना प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. कर्नाटक किंवा अन्य राज्यातील आंबा "देवगड किंवा रत्नागिरी' हापूसच्या नावाखाली विक्री करता येऊ नये यासाठी कोकणातील पाच जिल्ह्यातील सर्व आंबा शेतकरी आणि संबधित व्यवसायिकांना प्रमाणपत्र घेणे आवश्‍यक आहे.

'जीआय' नसल्यास कारवाईची शक्‍यता 

तरच अनधिकृत होणाऱ्या हापूस आंबा विक्रीस अटकाव करता येईल. यासाठीची नोंदणी प्रक्रीया संस्थेच्या जामसंडे येथील कार्यालयात सुरू आहे. यंदापासून प्रमाणपत्र न घेता हापूस आंबा म्हणून विक्री करणाऱ्या अथवा हापूस आंबा संबधित उत्पादने "हापूस' नावाखाली विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर जी.आय. सेक्रेटरीएटमार्फत कडक कारवाई होऊ शकते. यासाठी प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

आतापर्यंत 250 नोंदणी 
आतापर्यंत सुमारे 250 शेतकरी, व्यावसायिकांनी आपली नोंदणी केली असून त्यापैकी बऱ्याच जणांना प्रमाणपत्र आणि जी.आय. नोंदणी क्रमांकही प्राप्त झाले आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

Pune Crime : ‘एनएचएम’ मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोटयावधींचा गंडा; नोकरीत कायम करण्‍याच्‍या नावाखाली उकळले ७५ कोटी

Pakistan admits: मोठी बातमी! अखेर पाकिस्तानला कबूल करावंच लागलं ; 'अमेरिकेच्या मध्यस्थीसाठी कधीच तयार नव्हता भारत'

SCROLL FOR NEXT