Pramod Adhatrao criticize in vinayak raut political ratnagiri sadivali marathi news 
कोकण

' राऊत यांनी बेताल वक्तव्ये करू नये अन्यथा जशास तसे उत्तर देवू'

प्रमोद हर्डीकर

साडवली (रत्नागिरी)  : नारायणराव राणे ज्यावेळी शिवसेनेत मुख्यमंत्री झाले,विरोधी पक्षनेते झाले त्यावेळी यांना त्यांचे शिक्षण आड आले नाही आता मात्र भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षात त्यांचे वाढलेले वजन पाहून  त्यांची शिक्षण काढायची अवदसा सुचली. खासदार विनायक राऊत यांनी अशी बेताल वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा मतदारसंघातील विकासकामांबाबतीत बोलावे असा सणसणीत टोला लगावत तोंडावर लगाम ठेवा अन्यथा जशास तसे उत्तर देवू' असा इशारा भाजप संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटऱाव यांनी दिला आहे. तालुका भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभिजीत शेट्ये, सुशांत मुळ्ये, सुधीर गुरव,  सुधीर यशवंतराव, रूपेश कदम, राजेश गवंडी, अमोल गायकर, मिथुन निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.


खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते खा. नारायण राणे यांच्यावर टिका केल्यानंतर कोकणातले वातावरणात चांगलेच तापले आहे. माजी खासदार निलेश राणेंनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिले. आज तालुका भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. 
अधटराव म्हणाले, खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. शिवसेना प्रमुखांनी राणे साहेबांना मुख्यमंत्री केले तेव्हा त्यांचे शिक्षण विचारले नव्हते तर त्यांची कार्यपद्धती पाहिली. यातून कोकणचा विकासच झाला. आजही नारायण राणे आहेत म्हणून कोकणात विकास होतोय. आता ते भाजपमधे आले. त्यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इथे आले यातून राणे यांचे पक्षात वाढलेले वजन पाहुन आता शिवसेनेला धोका आहे हे समजल्याने खासदारांची अशी वायफळसुरु आहे. 

दोन्ही वेळा हे मोदी लाटेवर निवडून आले आणि आता भाजपवर टिका करताहेत. यांना विकासकामांचे नाही तर पक्षाचे पडले आहे. यांचा विकास म्हणजे केवळ रस्ते आणि पाखाडीपुरताच मर्यादित आहे. नाणार यांना चालत नाही. आज सगळे पक्ष नाणारसाठी प्रयत्न करत असताना खासदार गप्प का ? याचे उत्तर त्यांनी द्यावे. शिवसेनेला आता उतरती कळा लागली आहे. यांचे हिंदुत्व बासनात गुंडाळून ठेवले आहे. यांना पक्षाच्या कार्यक्रमांना हजारोंची गर्दी चालते मात्र छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंतीला मात्र लोकं नकोत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी सोयरीक झाल्याने आता हे हिंदूत्व विसरले आहेत.

अखंड महाराष्ट्रातील जनतेला हे समजले आहे. पुढीलवेळी त्यांना जनताच जागा दाखवणार आहे. आपले अस्तित्व टिकवताना आमच्या नेत्यांवर वायफळ टिका होत असेल तर ती आम्ही सहन करणार नाही. आता आमचा पक्ष पुर्वीसारखा सोशिक राहिला नाही तर आम्हीही आमच्या पध्दतीने उत्तर द्यायला सज्ज आहोत. यापुढे आमच्या नेत्यांवर टिका कराल तर याद राखा असा इशाराही अधटऱाव यांनी दिला आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT