Preparations for Ganeshotsav in konkan Sindhudurg 
कोकण

गणरायाच्या आगमनाची चाहूल; मूर्ती शाळांमध्ये लगबग, वाचा...

जॉन्सन फर्नांडिस

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गणेश चतुर्थी सणाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिल्याने जिल्ह्यातील सर्वच मूर्ती शाळांमध्ये मूर्तीकारांची लगबग वाढली आहे. मूर्तीकाम पूर्ण झाल्यानंतर आता मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. आता मूर्तिकार गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात दंग झाला आहे. 

जिल्ह्यामध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. वर्षातून एकमेव असणारा हा आनंदोत्सव जिल्ह्यातील सर्वांसाठी एक पर्वणीच असते. या उत्सवाला अवघे पाच दिवस शिल्लक असल्याने आता अनेक मूर्ती शाळांमध्ये मूर्ती रंग कारागिरांची लगबग वाढली आहे. दिवस-रात्र मेहनत करून बाप्पांच्या मूर्तीचे मूर्तीकाम पूर्ण झाल्यानंतर आता मूर्तींना रंगकामाचे वेध लागले आहेत.

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला अंतिम टप्प्यातील हे काम पूर्णत्वास कसे येईल? यासाठी सर्वच मूर्तिकारांची धावपळ सुरू आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध लागल्याने गणेश भक्तांना कोरोनाचा विसर पडू लागला आहे. बाप्पांची मूर्ती रंगवण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याने गावा गावातील नागरिक, लहान मुले आबालवृद्ध मूर्ती शाळांमध्ये रंगविलेल्या बाप्पांच्या मूर्ती पाहण्यासाठी गर्दी करत आहेत; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक मूर्तीकारांकडून गर्दी न होण्याविषयी खबरदारी घेतली जात आहे.

बरेच काम शिल्लक असलेल्या मूर्ती शाळांमध्ये मूर्तिकार दिवसाचे रात्रीही जागवून मूर्ती रंगकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. जिल्ह्यातील अनेक गावातील मूर्ती शाळेत मूर्तिकार रंगकामास वेग देत आहे. दोन-चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अधून-मधून विजेचा लपंडाव सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर रंगकाम जलदगतीने व्हावे, यासाठी मूर्तिकारांकडून शासनाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना योग्य दक्षतेची मागणी केली आहे. 

गेले काही दिवस मूर्ती रंगवण्यासाठी लगबग वाढली आहे. हे रंगकाम करण्यासाठी कारागीर मागविण्यात येतात. त्यांना थोडाफार रोजगार मिळतो; मात्र यावर्षी लॉकडाउनमुळे अडकलेल्या युवकांचे सहकार्य लाभले. विजेचा लपंडाव सुरू असल्याने या कामात व्यत्यय येतो. याचा विचार करून महावितरणने कर्मचारी सज्ज ठेवावेत. ज्यामुळे मूर्तीचे रंगकाम सुलभ होईल. 
- प्रवीण रेडकर, मूर्ती रंग कारागीर 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 3rd T20I : ९ चौकार, ११ षटकार.. अभिषेक शर्माच्या ३७ चेंडूंत ११३ धावा; क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना... टीम इंडियाचे वर्ल्ड रेकॉर्ड्स

Cabinet Meeting: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत ते पुण्यात राष्ट्रीय प्रदर्शन केंद्र... मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

MLC Election : मतदान ६२३, तर मतपेटीत ६७५ मतपत्रिका; मतमोजणीला सुरुवात होताच धक्कादायक प्रकार समोर

IND vs NZ 3rd T20I Live: १४ चेंडू फिफ्टी, ३० चेंडूंत शतक! भारताची वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी; अभिषेक शर्मा-वैभव सूर्यवंशी यांनी पेटवले रान...

Britannia News: तुम्हीही ब्रिटानियाचा ब्रेड खाता? ‘100% Whole Wheat’ दाव्यामुळे कंपनीला 1 लाखांचा दंड!

SCROLL FOR NEXT