कोकण

शेकडो टन कलींगड सडताहेत शेतातच: सिंधुदुर्गातील स्थिती

एकनाथ पवार

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : आठ ते दहा किलोची दर्जेदार फळे शेतात आहेत; परंतु खरेदीसाठी व्यापारीच नाहीत, निर्बंधामुळे स्थानिक बाजारपेठेत माल विक्री होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो कलींगड (Watermelon)उत्पादक शेतकरी (Faremer)अडचणीत आले आहेत. शेकडो टन शेतातच सडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उत्पादक आर्थिक संकटात आहे.

Productive economic crisis Hundreds of tons of watermelons are rotting in farm kokan agriculture marathi news

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत कलींगड लागवडीखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. खरीपातील भातपीकाची कापणी झाल्यानंतर अनेक शेतकरी कलींगड लागवडीकडे वळतात. नोव्हेंबर ते मे अखेरपर्यंत कलींगड उत्पादन घेतले जाते. एक एकरपसून १० एकरपर्यंत कलींगड लागवड करणारे अनेक शेतकरी जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण कलींगड पिकावर अवलंबुन आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी कलींगड गोवा, बांदा येथील व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात.

गोवा ही मोठी बाजारपेठ कलींगडसाठी मानली जाते. यावर्षी प्रतिकिलो १० ते १२ रूपयापर्यत दर मिळत होता. त्यामुळे चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु फेब्रुवारीपासुन कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढु लागली. शहरांप्रमाणे जिल्ह्यात देखील रूग्णांचे प्रमाण वाढु लागले. त्यातच ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला. दरम्यान राज्य शासनाने वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध घातले. सध्या जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू आहेत. याशिवाय बहुतांशी शहरातील नागरिकांनी आठ ते दहा दिवस पुर्णवेळ बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचा मोठा परिणाम कलींगड विक्रीवर झाला आहे.

मोठ्या प्रमाणात कलींगडची खरेदी ही गोव्यातील व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन खरेदी करतात; परंतु माल खरेदी करून करायचे काय असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे एखादा अपवाद वगळता व्यापारी कलींगड खरेदी करण्यास फारसे उत्सुक नाहीत. स्थानिक बाजारपेठा अकरा वाजेपर्यत सुरू असल्यामुळे तेथुनही उत्पादकांना दिलासा मिळेल अशी चिन्हे नाहीत. एप्रिलमध्ये कलींगडला चांगला दर मिळतो. त्यामुळे या महिन्यात कलींगड उत्पादन बाजारपेठेत येईल असे नियोजन करून अनेक शेतकरी लागवड करतात; परंतु हे सर्व शेतकरी आता अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो टन माल सडत असल्याचे दिसत आहे.

फळविक्रीला शासनाची मान्यता आहे; परंतु बाजारपेठेत अकरानंतर ग्राहकच नसेल तर विक्री होणार कशी असा प्रश्‍न उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे शेकडो कलींगड उत्पादक आर्थिक अडचणीत आले आहेत. काही मोजके व्यापारी खरेदी करण्यासाठी येतात; परंतु ते देत असलेला दर हा अगदीच किरकोळ आहे.

सलग दुसऱ्यावर्षी अडचणीत

गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील कलींगड उत्पादक आर्थिक संकटात सापडला होता. हजारो टन कलींगड शेतातच कुजले होते. सलग दुसऱ्यावर्षी कलींगडची नासाडी होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

गडमठ (ता.वैभववाडी) येथे आठ एकरात कलींगड पिक घेतले. पंधरा ते वीस दिवसांच्या फरकाने तीन टप्प्यात लागवड केली होती. पहिल्या टप्प्यातील कलींगडची विक्री झाली; परंतु दुसऱ्या टप्प्यातील जवळपास ४० ते ४५ टन माल शेतातच सडला. याशिवाय आता तिसऱ्या टप्प्यातील माल १० ते १२ मेपर्यंत तयार होणार आहे. तो कसा विक्री करायचा हा प्रश्‍न आहे.

- दीपक कासोटे, कलींगड उत्पादक शेतकरी, गडमठ

Productive economic crisis Hundreds of tons of watermelons are rotting in farm kokan agriculture marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT