PWD Minister Assures For Sonavade Ghat Sindhudurg Marathi News 
कोकण

सोनवडे घाटासाठी  बांधकाम मंत्र्यांचे 'हे' आश्‍वासन 

सकाळवृत्तसेवा

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - घोटगे सोनवडे घाट रस्त्याच्या प्रकल्प किमतीच्या दोन टक्के म्हणजेच 4 कोटी 20 लाख रूपयांची रक्कम सह्याद्री व्याघ्र प्रतिष्ठानकडे भरणे आवश्‍यक आहे. याकडे आमदार वैभव नाईक, आमदार प्रकाश आबिटकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे लक्ष वेधले. त्यावर अशोक चव्हाण यांनी ही रक्कम लवकरात लवकर देण्याचे मान्य केले आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हयातील विविध विकासकामांबाबत आढावा बैठक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाली. या बैठकीत घोटगे सोनवडे घाट रस्त्याच्या निधीबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी, मुख्य अभियंता प्रकाश इंगोले, रस्ते सचिव सी. पी. जोशी, सिंधुदुर्गमधील कार्यकारी अभियंता युवराज देसाई, श्री. शेवाळे उपस्थित होते. घोटगे सोनवडे घाटमार्गास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत अटी व शर्थीच्या आधारे मंजुरी मिळाली आहे.

त्याबाबत केंद्रीय मंत्रालयाने 29 ऑगस्ट 2019 ला कळविले; मात्र प्रकल्प किंमतीच्या दोन टक्के रक्कम म्हणजेच 4 कोटी 20 लाख रूपये सह्याद्री व्याघ्र प्रतिष्ठान यांच्याकडे भरायची आहे. ती भरल्यानंरच त्याबाबत अहवाल वन्यजीव विभाग तपासणीसाठी हाती घेणार आहे.

याबाबत आमदार वैभव नाईक, आमदार प्रकाश आबिटकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली व लवकरात लवकर निधीची तरतूद करण्याची मागणी केली. त्यावर अशोक चव्हाण यांनी सह्याद्री व्याघ्र प्रतिष्ठान यांच्याकडे भरणा करण्यास आवश्‍यक असलेला निधी लवकरात लवकर देण्याचे मान्य केले आहे, अशी महिती आमदार नाईक यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Letter : बाळासाहेब, पवार साहेब, महाजन यांनी कोणालाच पाठीशी घातल नाही; राज ठाकरेंची फडणवीसांवर 'सत्तेचा माज, मौनावर' कठोर शब्दांत टीका

India A vs Sri Lanka A : साई सुदर्शनची 168 धावांची खेळी; भारतीय कसोटी संघासाठी पुन्हा ठोकला दावा

Latest Marathi Live Update: आमचे ऑपरेशन 3.0 सुरू... आता महाभुकंप होणार ; संजय शिरसाटांचा मोठा दावा

Sugar Factory : साखरेतील सहकाराचा गोडवा ओसरला; १६ पैकी चार कारखाने बंद, दोन भाडेपट्ट्यावर

राम मंदिर दानचोरी : आता जमिनीवर बसून मोजणी होणार, कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेस कोड; ट्रस्टचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT