Rajapur  Cooperation Through First Rice Mil
Rajapur Cooperation Through First Rice Mil 
कोकण

सहकारातून राजापुरात पहिली राईस मिल

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) :  तालुक्‍यातील मूर, वाळवड येथील आदर्श संकल्प शेतकरी गटाने कृषी विभागाच्या आत्मा विभागाच्या सहकार्याने सहकाराच्या धर्तीवर तालुक्‍यातील पहिली राईस मिल सुरू केली आहे. गेली कित्येक वर्षे पडीक असलेले दहा एकर क्षेत्र ओलिताखाली आणून त्यात भातशेती करीत शेतीला ऊर्जितावस्था दिली. 

  गटाची व्याप्ती वाढविण्यासाठी स्वनिधीतून स्वभांडवल

जानेवारी २०१६ मध्ये मूर, वाळवड येथील तीस शेतकऱ्यांनी एकत्र येत आदर्श संकल्प शेतकरी गटाची स्थापना केली. दोन एकर पडीक जमीन ओलिताखाली आणत गटाद्वारे तीन वर्ष कुळीथ, भुईमूग, कलिंगड,भाजीपाला आदी पिके घेतली. गटाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी स्वनिधीतून स्वभांडवल उभारले. त्याला कृषी विभागाच्या आत्मा विभागाची जोड देवून त्यातून शासकीय योजनेचा लाभ घेत तालुक्‍यातील पहिली राईस मिल उभारली आहे.

राईस मिलवर तांदूळ तयार

राईस मिलमधील यंत्रसामुग्री अद्ययावत असल्याने वेळेची आणि मनुष्यबळाची बचतही होत आहे.राईस मिलला लागणाऱ्या भातासाठी सुमारे दहा एकर क्षेत्रावर इंद्रायणी, मनाली आदी संकरित बियाण्यांचा उपयोग करून भातशेती केली. शेतामध्ये पिकलेल्या भातासह परिसरातील शेतकऱ्यांकडून भात विकत घेऊन राईस मिलवर तांदूळ तयार करत तो बाजारपेठेमध्ये विकण्याचा मानस या शेतकरी गटाचा आहे. 

शेतीला उर्जितावस्था देण्यासाठी गटशेती

‘‘ सहकार रूजविणे आणि त्याच्या आधारे एकमेकांचा विकास साधणे हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेतकरी गट स्थापन केला. शेतीला उर्जितावस्था देण्यासाठी गटशेती केली. राईस मिल सुरू केली. या परिसरातील धरणांच्या पाण्याचा वापर करून भविष्यामध्ये पडीक जमीन ओलिताखाली आणणार आहोत.  ’’   -प्रकाश यद्रुक, अध्यक्ष आदर्श संकल्प शेतकरी गट

कृषी विभागाचे सहकार्य

‘ सहकार रूजविणे आणि वृद्धींगत करण्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार आणि प्रयत्नांना कृषी विभागाने सहकार्य केले. कोकणासाठी निश्‍चितच ही आनंदी आणि आदर्शवत बाब आहे. ’ 
- एस.एस.जगताप, तालुका कृषी अधिकारी

तांदळाचा ‘ब्रॅंडनेम’  करण्याचा मानस

गटशेतीत पिकणाऱ्या विविध बियाण्यांचा राईस मिलमध्ये तांदूळ तयार केला जाणार आहे. त्यामुळे राईस मिलमध्ये तयार केल्या जाणाऱ्या या तांदळाची योग्य प्रकारे प्रतवारी आणि आकर्षक पॅकिंग करून तो बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवला जाईल. या तांदळाचा स्वतंत्र ब्रॅंडनेम विकसित करण्याचा मानस गटाचे अध्यक्ष प्रकाश यद्रुक यांनी व्यक्त केला.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT