Rajapur Mahavikas Aghadi Politics esakal
कोकण

Konkan Politics : महाविकास आघाडीत फूट? ठाकरे गटाच्या मनमानी कारभाराने पदाधिकाऱ्यांत तीव्र नाराजी

राजापुरात (Rajapur) महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे.

सकाळ डिजिटल टीम

राजापुरात ठाकरे गटाच्या आमदार आणि खासदारांकडून होत असलेल्या मनमानीचा व अन्यायाचा पाढा कॉंग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वाचला.

राजापूर : राज्यात काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गट आणि ठाकरे शिवसेना (Shiv Sena) अशी महाविकास आघाडी आहे. तरीही राजापुरात ठाकरे गटाचे खासदार व आमदार काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. कार्यक्रमात सहभागी करून घेत नाहीत. विकासकामांकडे दुर्लक्ष करत मनमानी करतात, असा आरोप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.

त्यामुळे राजापुरात (Rajapur) महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे. राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्रित व एकसंघपणे काम करण्याचे धोरण ठरलेले असतानाही राजापुरात ठाकरे गटाच्या आमदार आणि खासदारांकडून होत असलेल्या मनमानीचा व अन्यायाचा पाढा कॉंग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वाचला.

अशीच भूमिका यापुढेही कायम राहणार असेल तर याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे मत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडले. राजापूर तालुका काँग्रेस कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी (ता. १३) काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार आणि आमदारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

राजापुरात ही मंडळी मनमानी करत असल्याचा आरोप करण्यात आला. आगामी निवडणुका लक्षात घेता ज्या भागात अद्यापही बूथ कमिट्या व मंडळ कमिट्या नियुक्त झालेल्या नाहीत. त्या त्यांनी पूर्ण कराव्यात, अशा सूचना सौ. खलिफे यांनी केल्या. नवरात्रोत्सवात जिल्हा परिषद विभागनिहाय दौऱ्याचेही नियोजन करण्यात आले.

बैठकीला माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, किशोर नारकर, जितेंद्र खामकर, ओंकार प्रभुदेसाई, देवदत्त वालावकर, प्रदीप भाटकर, नाना कुवेसकर, बाजी विश्वासराव, सुधीर मोरे, गोपाळ गोंडाळ, मलिक गडकरी, मजिद सायेकर, महिला आघाडीच्या सावित्री कणेरी, रघुनाथ आडीवरेकर आदी उपस्थित होते.

पदवीधर मतदार नोंदणीसाठी आवाहन

याप्रसंगी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी समन्वयक म्हणून माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांची नियुक्ती केली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी सहा नोव्हेंबरपूर्वी जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करावी, असे आवाहन सौ. खलिफे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT