Rajivada port is closed for fishing kokan marathi news 
कोकण

म्हणून साखरतर, राजिवडा बंदर मासेमारीसाठी बंदच...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यातील शेती व मत्स्य व्यवसायावरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. तरी सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. यासंदर्भातही आपण योग्य ती खबरदारी घेवून मार्गदर्शन लवकरच जाहीर करणार येणार आहे, असा दिलासा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिला. मात्र ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, त्या साखरतर आणि राजिवडा भाग सील केल्याने तेथील बंदरे मासेमारीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. 

पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खबरदारी
जिल्ह्यातील शेती व मत्स्य व्यवसायावरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. केंद्राने तसा निर्णय घेतल्यानंतर राज्याने आणि जिल्ह्यानेही त्याची अंमलबजवाणी सुरू केली आहे. मात्र सोशल डिस्टन्सची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तशा सूचना मच्छीमारा सोसायट्यांना देण्यात आल्या आहेत.
त्याची अंमलबजावणी होते की नाही यावर वॉच ठेवण्यात येणार आहे. मच्छीमार्केट देखील सुरू करण्यात येणार आहे. मात्र तिथेही सोशल डिस्टन्स राहावा यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे मच्छीमार, शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

निर्बंध उठवले तरी वॉच राहणारच
याबाबत सहाय्यक मत्स्य आयुक्त व्ही. एम. भादुले यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने शेती आणि मत्स्य व्यवसायावरील निर्बंध उठविले आहेत. परंतु राजिवडा आणि साखरतर येथे कोरोनाबाधित रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे दोन्ही भाग सील केले आहेत. या सील केलेल्या भागातील मासेमारी सुरू होणार नाही. तो सर्व अधिकारी पोलिस प्रशासनाचा आहे. मात्र राजिवडा आणि साखरतर ही दोन्ही बंदरे मासेमारीसाठी पुढील निर्णय होईपर्यंत बंद राहणार आहेत. त्याचे काटेकोर पालन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT