कोकण

रामपूर महिला सरपंचांची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

चिपळूण - तालुक्‍यातील रामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि कर्तृत्ववान महिला राजकारणी अशी ओळख निर्माण केलेल्या श्रेया धनंजय रावराणे (वय ३५) यांनी विष घेऊन आत्महत्या केली. त्यांनी मंगळवारी (ता. ५) दुपारी विष घेतले. चिपळुणात उपचार करून त्यांना मुंबईला नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. 

श्रेया रावराणे यांच्या आत्महत्येमुळे चिपळूण तालुक्‍यात राजकीय वर्तुळात धक्का बसला. याबाबत त्यांचे बंधू गणेश श्रीपाद साळवी (रा. मार्गताम्हाणे बाजारपेठ) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आज सायंकाळी श्रेया यांच्यावर रामपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे उद्योजक पती धनंजय रावराणे व मुलगा आहे.

सोमवारी (ता. ४) रामपूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा ऐतिहासिक झाली. एका व्यवसायाला परवानगी देण्याबाबत काहीसा गोंधळ झाला होता. सरपंच रावराणे यांचा मुलगा दहावीत असल्याने त्याच्या अभ्यासासाठी त्या तीन महिन्यांपासून चिपळुणात वास्तव्यास होत्या. दररोज रामपूरला येऊन-जाऊन असा दिनक्रम सुरू होता. मंगळवारी त्यांचा वाढदिवस होता. दुपारी दोनच्या सुमारास पती धनंजय रावराणे यांना पत्नी घरी अस्वस्थ असल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ त्यांना चिपळुणातील लाईफ केअर रुग्णालयात दाखल केले; मात्र 
उपचारांना त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मुंबईस हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत पोचण्यापूर्वीच वाटेत मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांचे निधन झाले. 

रामपूर ग्रामपंचायतीच्या तीन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत श्रेया रावराणे यांना सरपंचपदी संधी मिळाली. खंबीर तसेच कर्तृत्ववान सरपंच म्हणून तालुक्‍यात त्यांची ओळख होती. राष्ट्रवादीच्या त्या खंबीर कार्यकर्त्या होत्या. रामपूरमध्ये आज झालेल्या अंत्यसंस्काराप्रसंगी शेकडो राजकीय, तसेच सामाजिक कार्यकर्ते, तालुक्‍यातील अनेक सरपंच उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT