ramzan special story in ratnagiri 
कोकण

रमजान म्हणजे नेमके काय...? घ्या जाणून

मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) : सामान्य माणसांमध्ये रमजानविषयी अनेक गैरसमज आहेत. रमजान म्हणजे वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्याचा महिना आहे. ही एक व्यंजनजत्रा आहे. देशोदेशीचे खाद्यपदार्थ, उच्चप्रकारच्या मिठाया बाजारात उपलब्ध होतात. मुसलमान रात्रभर त्या मिठाया-अन्नपदार्थ खातात आणि दिवसभर उपाशी राहतात, असे अनेकांना वाटते. पण रमजानचे वास्तव निराळे आहे. रमजानमध्ये मुसलमान स्वत:च्या सामाजिक, धार्मिक, नैतिक स्थितीगतीचे पुनरावलोकन करतात. आत्मपरीक्षण करतात. त्यातील उणिवा, दोष दूर करतात. स्वत:मध्ये बदल घडवून आणतात. स्वत:मध्ये नैतिक सुधारणा घडवतात. मानवी जाणिवांच्या पातळीवर वर्षभराच्या संघर्षासाठी स्वत:ला सिद्ध करतात. रमजान हा अल्लाहच्या आराधनेचा महिना आहे. 


रमजान अल्लाहच्या आराधनेचा महिना 

रमजानमध्ये इस्लामचे श्रद्धावंत सूर्योदय ते सूर्यास्त कडक उपवास करतात. मुस्लिमांच्या धर्मातील 5 आधारस्तंभातील हा एक आधारस्तंभ आहे. मुहम्मद पैगंबर (स.) रमजानबाबत म्हणतात, या महिन्यात स्वर्गाचे दरवाजे खुले असतात व नरकाचे बंद असतात. याचा प्रतिकात्मक अर्थ आहे की, इस्लामच्या माध्यमातून जीवनातील कर्तव्यपूर्ती करता येतात. स्वत:ला अल्लाहसमोर समर्पित करून त्याने दिलेल्या आदेशानुसार जगण्यासाठी मुसलमान प्रयत्न करतात. मुसलमान म्हणून असणारी सारी धार्मिक कर्तव्ये पार पाडतात. रमजानमध्ये साजरा करण्याच्या इस्लामी उपासना संस्कृतीत ’रोजा, जकात, नमाज, तरावीह’ यांचा समावेश होतो.

असा करतात रोजा

प्रत्येक सज्ञान व्यक्तीसाठी रोजा अनिवार्य करण्यात आला आहे. पण अपवादात्मक परिस्थितीत त्यातून सूट दिलेली आहे. उदा. आजारपणात, प्रवासात वगैरे. रोजा धारण करण्यासाठी पहाटे सूर्योदयापूर्वी जेवण करणे अनिवार्य आहे. त्याला सहेरी असे म्हणतात. एकदा सहेरी केल्यानंतर दिवसभर रोजा धारण करणारी मुस्लीम व्यक्ती कसल्याही प्रकारचे अन्न सेवन करु शकत नाही. पाण्याचे एक थेंबसुद्धा घेऊ शकत नाही. सायंकाळी सूर्यास्तानंतर रोजाचा कालावधी पूर्ण होतो. त्यानंतर रोजाची पूर्तता होते. रोजाच्या काळामध्ये भुकेच्या दारित्र्याची जाणीव माणसाला होते. या काळात इस्लामी विधीसंहितेत निषिद्ध मानलेली कोणतीही कृती रोजदार व्यक्ती करत नाही. त्याचे काटेकोर पालन केले जाते.

इस्लाम धर्मामध्ये नमाज ही मूळ उपासना आहे.

इस्लाम धर्मामध्ये नमाज ही मूळ उपासना आहे. दिवसातून पाचवेळा नमाज अदा करणे प्रत्येक मुस्लीम व्यक्तीसाठी अनिवार्य आहे. रमजानमध्ये  तरावीहची नमाज पठण करणे देखील गरजेचे आहे. तरावीहच्या नमाज दरम्यान कुरआनचे पठण केले जाते. अनेक मुसलमान रमजानच्या काळात कुरआन पठणाचे पुनरावलोकन करतात. रमजानमध्ये कुरआन अवतरीत झाले. त्यामुळे रमजान इस्लामी तत्त्वज्ञानाच्या पूर्णत्वाचा काळ म्हणूनही ओळखला जातो. कुरआनमध्ये सांगितलेल्या मार्गदर्शक नियमांनुसार जीवन व्यतित करणे प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे. कुरआनमध्ये 30 खंड आहेत आणि 114 अध्याय आहेत.

कुरआनमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राविषयी भाष्य करण्यात आले आहे. रमजानमध्ये सामूहिक कृती आणि समाजकल्याण भावना या दोन्ही विचारांच्या आधारेच मानवी जीवनाच्या हितासाठी मुसलमान प्रयत्न करतात. इस्लाममध्ये माणसाच्या कल्याणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवहितासाठी कार्यरत राहणे प्रत्येक मुसलमनाचे ऐहिक जीवनातील महत्त्वाचे कर्तव्य आहे. 
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT