रत्नागिरी : वडाप वाहतुकीला शासकीय बूस्टर sakal
कोकण

रत्नागिरी : वडाप वाहतुकीला शासकीय बूस्टर

८६४ वाहनांचा वापर ; प्रवासी वाहतुकीत सुधारणा

- राजेश शेळके

रत्नागिरी : अवैध प्रवासी वाहतुकीला (वडाप) प्रतिबंध घालणाऱ्या शासनासह आरटीओ, पोलिस, एसटी अधिकारीच खासगी वाहनांमध्येच प्रवाशांना बसण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे विचित्र चित्र जिल्हाभरात दिसत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने शासकीय यंत्रणांवर ही वेळ आणली आहे. जिल्ह्यात प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी शासनाच्या आदेशाने आगारनिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करून मिनी बस, बस, कॉन्ट्रॅक्ट कॅरिज, स्कूल बस, मोटार, रिक्षा आदी ८६४ वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक करण्यात आली.मात्र एसटीएवढेच भाडे आकारण्याचे बंधन होते.

संपामुळे प्रवाशांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक आगारात प्रशासनाकडून संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. याविषयी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी मडळांतर्गत येणाऱ्या नऊ एसटी डेपोमध्ये प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी खासगी बसेसची मदत, आवश्यक संरक्षण उपलब्ध व्हावे म्हणून पोलिस विभाग व होमगार्डची मदत तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी परिवहन विभाग पोलिस व एसटी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

संप सुरूच असल्याने काल झालेल्या बैठकीतून जिल्ह्यातील वाहतूक संघटना, खासगी बसेस, स्कूल बस यांच्याशी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी संपर्क साधला व या वेळी रिक्षा, मोटार, कॉन्ट्रॅक्ट कॅरिज ४९९ बस, स्कूल बस २६९ आणि खासगी ९६ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास आज काहीसा सुकर झाला. शासनाने संप काळात मालवाहतूक वाहनांनादेखील प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली असल्याचे मेडसीकर यांनी सांगितले.

एरवी हिच शासकीय यंत्रणा खासगी अवैध वाहतुकीविरुद्ध रस्त्यावर उतरते. अक्षरशः पाठलाग करून वडापच्या गाड्यांवर कारवाई केली जाते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुकीची कारवाई केली जाते. मात्र एसटीच्या संपाने याच वडापधारकांची मनधरणी करण्याची वेळ शासकीय यंत्रणेवर आली आहे.

प्रशासनाचा योग्य निर्णय

जिल्हाभरात एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती. पण प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन खासगी बसेस, स्कूल बस यांच्या माध्यमातून प्रवाशांची गैरसोय टाळता आली. प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागली नाही. लवकरात लवकर या संपावर तोडगा निघावा व प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी,असे मेडसीकर यानी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT