Neelima Chavan Death Case esakal
कोकण

Neelima Chavan Case : मृत्यूच्या आदल्या दिवशी नीलिमा कुठे होती? घातपात झाला का? पोलिसांनी दिली महत्वाची अपडेट..

नीलिमा मृत्यू प्रकरणात नवे ट्विस्ट आले आहे

सकाळ डिजिटल टीम

पाण्यात पडून ७२ तास झाल्याने मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यातूनच डोकीवरचे केस गेले. ही घटना घडली त्या दिवशी नीलिमा खेड बसस्थानकात आली होती.

रत्नागिरी : नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी (Neelima Chavan Death Case) आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये प्रथमदर्शी निष्पन्न झालेल्या बाबी म्हणजे तिचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून, त्यानुसार तिच्या शरीरावर कुठल्याही मृत्यूपूर्वी जखमा तसेच अंतर्गत जखमा दिसून आलेल्या नाहीत, असे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवला आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यू कशाने झाला, हे निष्पन्न होईल; परंतु घातपात झाल्याचा कोणताही पुरावा हाती लागलेला नाही, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या. नीलिमा मृत्यू प्रकरणात नवे ट्विस्ट आले आहे. एकीकडे नातेवाईक घातपात असल्याचा दावा करत आहेत. विविध संघटना, समाज या घातपाताची सखोल चौकशी करून संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

कुलकर्णी म्हणाले, ‘‘नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी आजवर झालेल्या तपासावरून घातपात असल्याचा एकही पुरावा मिळालेला नाही. हा प्राथमिक अंदाज असला तरी सर्व गोष्टी पडताळून तपास चालू राहणार आहे. नीलिमा मूळची चिपळूण तालुक्यातील ओमळी गावची आहे. ती मैत्रिणींसोबत दापोलीत खोली घेऊन राहत होती.

नीलिमाचे येण्या-जाण्याचे मार्ग कोणते होते, याची माहिती घेऊन ते सर्व मार्ग तपासले. सर्व सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले; परंतु काहीच हाती लागलले नाही. नीलिमाचा मृतदेह सापडल्यानंतर तिच्या अंगावर जखमा आहेत, तिच्या डोकीवरचे केस काढल्याचे आरोप केले; त्यावरून अनेक तर्कवितर्क लढविले. यासंदर्भात केईएम हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागाची मदत घेण्यात आली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्यात पडून ७२ तास झाल्याने मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यातूनच डोकीवरचे केस गेले. ही घटना घडली त्या दिवशी नीलिमा खेड बसस्थानकात आली होती. तेथे तिला मैत्रीण भेटली. दोघींमध्ये गप्पा झाल्या. मैत्रीणही चिपळूणला जाणार होती. मात्र, तिची बहीण सोबत असल्याने ती रेल्वे स्थानकाकडे निघून गेली आणि नीलिमा चिपळूणकडे जाणाऱ्‍या बसमध्ये बसली व भरणे नाका येथे उतरली.

नीलिमाच्या खांद्याला बॅग होती. ज्याने ती बॅग उचलली होती ती भीतीपोटी पुन्हा जगबुडीच्या पात्रात फेकून दिली. या बॅगेचा शोध घेण्यासाठी ८० कर्मचारी दोन दिवस जगबुडी ते दाभोळ खाडी असे सर्च ऑपरेशन करीत आहेत. अद्याप बॅग पोलिसांच्या हाती लागलेली नाही.’’

ज्यावेळी नीलिमा भरणे पुलाकडे आली, त्यावेळी एका व्यक्तीने तिला पाहिले होते. ती व्यक्ती भरणे नाक्याकडे निघून गेली. त्यानंतर त्याच मार्गाने येणाऱ्‍या दुसऱ्‍या व्यक्तीला ती बॅग दिसली. ज्या साक्षीदाराने ही बॅग घरी नेली त्याने बॅगेचा पहिला कप्पा उघडला असता बॅगेमध्ये तिचे आधारकार्ड व एक छोटी पर्स मिळून आली. त्या पर्समध्ये फक्त ११ रुपये होते, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

व्हिसेराकडे लक्ष

या प्रकरणात शवविच्छेदनाचा अहवाल घातपात नसल्याचे स्पष्ट करीत असल्याने व्हिसेरा तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविला आहे. चार दिवसांत त्याचा अहवाल अपेक्षित असून या अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे कुलकर्णी त्यांनी यावेळी सांगितले.

तपास सीबीआयकडे देण्याची मागणी

मंगळवारी नीलिमाचे नातेवाईक पोलिस अधीक्षकांच्या भेटीसाठी आले होते. या भेटीनंतर नातेवाईकांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तपासाबाबत संशय व्यक्त करीत हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी निलिमाच्या नातेवाईकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT