Bholavali dam in Mandangad esakal
कोकण

Ratnagiri Rain : मंडणगडातील 'या' धरणाला लागली गळती; पाणीपातळी वाढल्यास धोक्याची शक्यता, गावांत भीतीचं वातावरण

धरणाला गळती लागल्याने ग्रामस्थ चिंतेत असून याबद्दल स्थानिक महसूल प्रशासनासही माहिती देण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

धरणाच्या बाबतीत काही आगळीक घडल्यास पूर्ण भोळवली गाव अडचणीत येऊ शकते, ही बाब लक्षात घेता भिंतीतील गळतीमुळे होणाऱ्या परिणामांची चिंता ग्रामस्थांना लागली आहे.

मंडणगड : तालुक्यातील (Mandangad) भोळवली येथील धरणाच्या (Bholavali Dam) भिंतीला यंदाच्या पावसात गळती लागल्याने पाटबंधारे विभाग दापोली यांनी २६ जुलैला ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर धरणात साठलेल्या पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

धरणाला गळती लागल्याने ग्रामस्थ चिंतेत असून याबद्दल स्थानिक महसूल प्रशासनासही माहिती देण्यात आली आहे. पाटबंधारे विभाग दापोली धरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत. धरण सुरक्षित आहे अथवा नाही व गावास किती धोका आहे.

या विषयी यंत्रणेने योग्य तो खुलासा वेळेवर करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. देवाचा डोंगर येथून उगम पावणाऱ्या भारजा नदीचे पाणी अडवून बांधण्यात आलेल्या या माती धरणाचा आकार लघू स्वरूपाचा असून धरणाची पाणी साठवण्याची ६.९१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे.

भारजेच्या प्रवाह मार्गावर कादवण, लाटवण, पिंपळोली तिडे, तळेघर, पालघर, बामणघर, बोरघर, माहू, तुळशी, नायणे, कोन्हवली, वडवली, चिचंघर ही गावे येतात या गावातील नदीकिनारी असलेल्या गावांना धरणातून पाणी सोडल्याने प्रवाहाची पाणीपातळी वाढल्याने धोका निर्माण होऊ शकतो.

याचबरोबर धरणाच्या बाबतीत काही आगळीक घडल्यास पूर्ण भोळवली गाव अडचणीत येऊ शकते, ही बाब लक्षात घेता भिंतीतील गळतीमुळे होणाऱ्या परिणामांची चिंता ग्रामस्थांना लागली आहे. दरम्यान, तहसीलदार तानाजी शेजाळ, पोलिस निरीक्षक शैलजा सावंत, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता गोसावी यांनी २७ जुलैअखेर गावास भेट देत ग्रामस्थांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

याशिवाय नदीकिनारी असलेल्या गावातील ग्रामस्थ व धोकादायक घरांना खबरदारी घेण्याच्या सूचना महसूल विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. पाटबंधारे विभागाला योग्य ती कारवाई करण्याची सूचनाही महसूल विभागाने दिलेली आहे.

  • सांडव्यावरील विसर्ग ६.२९५ घमी/सेकंद

  • माती धरणाची लांबी ः ४९० मीटर (माती धरण)

  • धरणाची उंची ः ३५.३२ मीटर, टॅाप ३ मीटर, पाया १३३ मीटर

  • डावा कालवा ७.६ किलोमीटर, मुख्य विमोचक २.८४ मीटर. (आरसीसी)

  • पाणी साठवण क्षमता ः ६.९१ दशलक्ष घनमीटर

  • बुडित क्षेत्र ः ४५.७२ हेक्टर.

  • सिंचन क्षेत्र ः ३३० हेक्टर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT