सावंतवाडी येथील मोती तलावात.
सावंतवाडी येथील मोती तलावात. sakal
कोकण

सावंतवाडी मोती तलावाचा पदपथ खचल्याने धोका

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : येथील मोती तलावाच्या काठावर असलेला पदपथ हा ठिकठिकाणी खचला असून, तो पादचाऱ्यांसाठी धोकादायक बनला आहे. या समस्येकडे पालिका प्रशासनाने लक्ष घालून धोकादायक फूटपाथ तत्काळ दुरुस्त करावा, अन्यथा या खड्ड्यात वृक्षारोपण करू, असा इशारा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पालिका प्रशासनाला दिला.

त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मोती तलावाच्या काठावरील पदपथ धोकादायक बनला आहे. तो अनेक ठिकाणी खचला असून, खोल खड्डे पडले आहेत. यामुळे पादचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्या खड्ड्यात पादचाऱ्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी, लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत. गाळ काढतानाही तीन मुशी परिसरातील फूटपाथ खचून उंच सखल बनला आहे. तोदेखील दुरुस्ती होणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत पालिका प्रशासनाने तत्काळ भूमिका घेत पदपथाचे काम तत्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार राहील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT