School Students Are Also Heart Attack In Ratnagiri Kokan Marathi News 
कोकण

सावधान : शालेय विद्यार्थीही हृदयविकाराच्या विळख्यात....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शालेय विद्यार्थी हृदयविकारासह इतर गंभीर आजारांच्या फेऱ्यात अडकल्याचे पुढे आले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी अहवालामध्ये ही बाब स्पष्ट झाली. या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ३१८ विद्यार्थी इतर शस्त्रक्रियेसाठी तर ३९ विद्यार्थ्यांना हृदयाचे विकार असून यापैकी २२ विद्यार्थ्यांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया केली आहे. 

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी केली जाते. डिसेंबर २०१९ अखेर जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली. शाळांमधील १ लाख ५२ हजार २८२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. तर अंगणवाडी स्तरावरील १ लाख ७ हजार ५१९ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली आहे. तपासणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २४ हजार ३५० विद्यार्थ्यांवर शाळेमध्येच औषध उपचार पुरवण्यात आले आहेत.

३०० विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया

संदर्भसेवेसाठी खास शिबिरे घेण्यात आली. ७ हजार ९०२ विद्यार्थ्यांना संदर्भ सेवेकरीता निवडले होते. यापैकी ७ हजार ६५२ विद्यार्थ्यांवर संदर्भ सेवेमध्ये उपचार करण्यात आले. 
संदर्भसेवा शिबिरामध्ये तपासणी अंती अंगणवाडीमधील ७३ विद्यार्थी सॅम श्रेणीतील तर ६९५ विद्यार्थी मॅम श्रेणीतील असल्याचे आढळून आले. ३१८ विद्यार्थ्यांना इतर शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरवण्यात आले. यापैकी ३०० विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया केली आहे.

३९ विद्यार्थ्यांना हृदयरोगाने ग्रासले

यामध्ये अंगणवाडीतील १३९ जणांवर तर पहिली ते बारावीपर्यंतच्या १७९ जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. १६ विद्यार्थ्यांवर अद्याप शस्त्रक्रिया करणे बाकी आहे. या विद्यार्थ्यांना हर्निया, ॲपेंडिक्‍स, इएनटी, हृदयरोग यासारखे आजार झाल्याचे निदान करण्यात आले. तपासण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३९ विद्यार्थ्यांना हृदयरोगाने ग्रासल्याने त्यांना हृदय शस्त्रक्रियेसाठी संदर्भात करण्यात आले. यापैकी २२ विद्यार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. हृदयाचे रोग लहान विद्यार्थ्यांना बळावत असल्याने हा चिंतेचा विषय ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group UP: टाटा समूहाने UP साठी उघडला खजिना; लखनौला बनवणार 'एआय सिटी', TCS मध्ये करणार मेगा भरती

Open Golf: नवी मुंबईत एक कोटी रुपये बक्षिसांची गोल्फ स्पर्धा; राष्ट्रीय अन्‌ आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग; १८ होल मैदानावर चुरस

Latest Marathi News Live Update : सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी भाजपाची जोरदार तयारी

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

UP Accident: यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; दाट धुक्यामुळे ५ बस आणि कार एकमेकांना भिडल्या, ४ ठार, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT