कणकवली : कोकण विकास आघाडीचे 37 वे वार्षिक अधिवेशन 25 डिसेंबरला मुंबईत होणार आहे. दादर शिवसेना भवननजीक असलेल्या महादेव हरी वैद्य सभागृहात हे अधिवेशन होईल. यात कोकण रेल्वेचे दुपदरीकरण तातडीने होणे, कोकणसाठी एस.टी. महामंडळाचे स्वतंत्र धोरण असावे यासह कोकणात पर्यटनावर आधारित उद्योग यावेत याबाबतच्या विषयांवर चर्चा, परिसंवाद होणार आहेत. कोकणच्या सर्व जिल्ह्यातील कोकणवासीयांनी या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केले आहे.
नांदरूख गिरोबाचा उद्या जत्रोत्सव
कणकवली : सात गावांची ग्रामदेवता असलेल्या नांदरूख येथील गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी (ता.16) होणार आहे. या जत्रोत्सवात मालवण शहरासह कातवण, कर्लाचा व्हाळ, कुंभारमाठ, घुमडे येथील नागरिकांसह जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतातत. जत्रोत्सवात रात्री नऊ वाजता पालखी मिरवणूक, भजने आणि रात्री बारानंतर वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.