Rajan Salvi vs Uday Samant esakal
कोकण

Rajan Salvi : उदय सामंतांविरुद्ध राजन साळवींनी केलेल्या 'त्या' अपशब्दाचा शिंदे गटानं केला निषेध; असं काय म्हटलं आमदारानं?

आमदार राजन साळवी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते.

सकाळ डिजिटल टीम

पत्रकार परिषदेत आमदार राजन साळवी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला.

लांजा : जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांचा शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्यावतीने लांजा येथे जाहीर निषेध करण्यात आला. तालुक्यातील सापुचेतळे येथे शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने सोमवारी (ता. ९) होऊ दे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात आमदार राजन साळवी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या प्रकरणी आज शिवसेना शिंदे गटाच्यावतीने लांजा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली.

या वेळी माहिती देताना तालुकाप्रमुख गुरूप्रसाद देसाई तसेच येथील पालकमंत्री यांचे समर्थक शंकर गोरे यांनी सांगितले, होऊ दे चर्चा या कार्यक्रमात विकासावर चर्चा करत असताना आमदार राजन साळवी यांनी आपण तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास केला. खानवली सापुचेतळे या रस्त्याला चार कोटींचा निधी मंजूर करून आणला. उलट उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून खाली आणण्याचे काम उदय सामंत यांनी केले म्हणत त्यांच्याविषयी अपशब्द वापरले होते.

त्याला शंकर गोरे यांनी जोरदार विरोध करत तीन प्रश्न विचारून निरूत्तर केले होते. या पार्श्वभूमीवर आज लांजा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली आणि आमदार राजन साळवी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला.

गेल्या १५ वर्षांत आमदार म्हणून राजन साळवी यांनी या मतदार संघात किती विकास केला आहे, हे जनतेला ज्ञात आहे आणि म्हणूनच मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मताधिक्क्यात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. २०२४ च्या निवडणुकीत कोण कोणाला गाडते यापेक्षा गेल्या दहा वर्षात किती विकास झाला, हे बघूनच लोक मतदान करतील आणि संबंधितांना त्यांची जागा दाखवून देतील, असे तालुकाप्रमुख देसाई म्हणाले. यानंतर आमदार राजन साळवी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT