Sindhudurg DCC Bank Election Updates Esakal
कोकण

सिंधुदुर्ग बँक मतदान संपताच शिवसेना,भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

मतदान केंद्राच्या बाहेर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने

सकाळ डिजिटल टीम

कणकवली : जिल्हा बँक निवडणुकीतील (Sindhudurg District Central Co operative Bank Election) मतदान संपल्यानंतर शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांनी फटाके लावून आतिषबाजी करण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्युत्तर म्हणून भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने कणकवली निवडणूक मतदान नंतर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या मंडळींना बाहेर जा असे सांगितले मात्र, मुंबई-गोवा महामार्गावर दोन्ही बाजूने कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी पोलिसांनी वेगवेगळे पथक तैनात केले. दंगा काबू पथक तसेच ब्लॅक कमांडो ही यावेळी उपस्थित ठेवण्यात आले होते.

दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी होती. महाविकास आघाडीचे प्रमुख उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते पुलाखाली उभे राहून घोषणाबाजी देत होते, तर भाजपचे प्रमुख कार्यकर्ते एकत्रित येत घोषणाबाजी देत होते. त्यामुळे तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे अजून तरी कोणती अपरिचित घटना घडलेली नाही, मात्र सर्वांचे लक्ष आहे ते उद्याच्या निकालाकडे. तसेच सायंकाळपर्यंत लागणाऱ्या आमदार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात थोड्याच वेळात नितेश राणे यांना अटक होणार की जामीन मिळणार याचा निकाल लागणार आहे. मतदान केंद्राच्या बाहेर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. यावेळी संपूर्ण जिल्हा बॅंकेत महाविकास आघाडीचे पॅनेल येईल असे वैभव नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer : अभिनेत्यांना नोटीस बजावताच तुकाराम मुंढेंच्या बदलीची चर्चा? २१ वर्षांत २५ बदल्या; FDAमधील धडक कारवाईने पुन्हा चर्चेत

पोलिसांच्या मारहाणीत ५५ वर्षीय पुजाऱ्याचा मृत्यू, कुटुंबियांचे गंभीर आरोप, न्यायालयाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय घडलं?

Paithan Farmers: शेतात जाण्यास रस्ताच नाही! दोन वर्षे पाठपुरावा करूनही न्याय नाही; शेतकरी भावंडांचे आमरण उपोषण

AAMIR KHAN FITNESS: 61 व्या वर्षी देखील आमिर खान फिट कसा? केबीसीच्या सेटवरच सांगून टाकलं गुपित, म्हणाला... 'मी रोज सकाळी उठून...'

Marathi News Live Updates : व्हिडीओ शूटिंगच्या वादातून तरुणाची गच्चीवरून फेकून हत्या

SCROLL FOR NEXT