Shekhar Nikam  sakal
कोकण

गाळ काढण्याचे काम आपत्ती व्यवस्थापनातून करावे : आमदार शेखर निकम

विधिमंडळात केली मागणी; कोकणच्या निधीप्रश्‍नी हात आखडते

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : कोकण(kokan) सगळ्यांनाच आवडतो, मात्र कोकणचा एखादा प्रश्न सोडवायचा असेल अथवा निधी द्यायचा असेल तर थोडेसे हात आखडते घेतले जातात. ७०० ते ८०० कोटी रुपये मोठी रक्कम नाही. सगळेच आश्वासने देतात. कोकणाच्या तोंडाला नेहमीच पाने पुसली जातात. चिपळुणातील नद्यांमधील(chiplun rivers) गाळ व बेटे तातडीने काढण्यासाठी १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा. ही कामे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत झाली पाहिजे, अशी मागणी आमदार शेखर निकम (mla shekhar nikam)यांनी हिवाळी अधिवेशनात केली.

गेल्या १७ दिवसांपासून चिपळूण बचाव समितीने वाशिष्टी(vashishthi) व शिवनदीतील(shivnadi) नदीतील गाळ काढावा व पूररेषा रद्द करावी, या मागणीसाठी येथील प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. ''भिक मांगो आंदोलन,'' मूक मोर्चा'' काढला. तर बुधवारी चिपळूण बंदची (chiplun closed)हाक दिली. आणि चिपळूणवासीयांनी देखील तितकाच प्रतिसाद दिला. चिपळूणवासीयांच्या भावना तीव्र आहेत, हे दाखवून दिले आहे. अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी चिपळूणच्या गाळाचा प्रश्‍न पोटतिडकीने मांडला. निकम म्हणाले , २२ जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे चिपळूणचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये.

तर कोकण पूर्णपणे उद्ध्वस्त

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत ३२०० कोटी रुपये कोकणाला देणार असाल तर चिपळुणातील नद्यांमधील गाळ व बेटे काढणे. तेथील नद्या मोकळ्या करणे, छोटे- छोटे बंधारे बांधणे या कायमस्वरूपी योजना तातडीने होणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी नद्यांमधील गाळ काढला गेला नाही तर कोकण पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, अशी भीतीदेखील आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केली.

आपत्तीत तीन टप्प्यात काम

आपत्तीत तीन टप्प्यात काम करतो. पहिल्या टप्प्यात मदत देतो. दुसऱ्या टप्प्यात उभारणीसाठी सहकार्य करतो तर तिसऱ्या टप्प्यात या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी योजना आखतो, असे आमदार निकम यांनी यावेळी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT