snakefriend akshay kharen save the life of a snake in a trapped 
कोकण

तो चार दिवस होता अडकून​ अखेर अक्षयमुऴे वाचला त्याचा जीव....

सकाळ वृत्तसेवा

गुहागर (रत्नागिरी) : चार दिवस जाळ्यात अडकून पडलेल्या 9 फुटी अजगराला सर्पमित्र अक्षय खरे यांनी जीवदान दिले. भुकेल्या अजगराला अन्न मिळेल अशा ठिकाणी जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले. वरचापाट मोहल्ला येथे खाजणात जाळ्यात हा अजगर अडकला होता.


गुहागर शहरातील वरचापाट मोहल्ला येथे खाजणात एक अजगर चार दिवस अडकला होता. सुरवातीला अजगर स्वत:हून जाईल म्हणून लोकांनी लक्ष दिले नाही. मात्र जाळ्यात अडकल्याने अजगराला तेथून स्वत:ची सुटका करुन घेता येत नव्हती. चार दिवस अडकून पडल्याने त्याची वळवळही कमी झाली होती. अखेर नगरपंचायतीमधील भाजपचे गटनेते उमेश भोसले यांनी सर्पमित्र अक्षय खरे यांना विनंती केली. साठलेला कचरा, नदी किनाऱ्याजवळची दलदल, आजुबाजुला उगवलेले रान अशा ठिकाणी उतरण्याचे धाडस अक्षय खरेंनी केले.

जाळ्यात अडकलेल्या अजगराला जीवदान​

कात्री आणि स्नेकस्टीक या साहित्याच्या आधाराने अजगराला जाळ्यातून सोडविण्याचे काम अक्षय करत होता. यावेळी तोंडाजवळील जाळी काढताना अजगराने दोनदा जीव वाचविण्यासाठी अक्षयवर हल्ला केला. मात्र सावधानतेने अक्षयने अजगराला जाळ्यातून सोडविले. अजगराचा जीव वाचला. परंतु तो जगण्यासाठी तत्काळ त्याला अन्नाची गरज होती. त्यामुळे सहज अन्न उपलब्ध होईल अशी जागा निवडून अक्षय खरे यांनी 9 फुटी अजगराला जंगला सोडले.

सर्पमित्र अक्षय खरेंची कामगिरी, चार दिवस होता अडकून​


या घटनेनंतर अक्षय खरे म्हणाले की, घराच्या खिडक्यांना जाळी लावणे योग्य आहे. आपल्याकडे मच्छीमारांची तुटलेली जाळी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे परसात रचून ठेवलेली लाकडांवर,  बागेला कुंपणासाठी जाळी लावली जातात. विहीरीत कचरा पडू नये म्हणूनही जाळे बांधुन ठेवले जाते. परसावात, बांधावर जाळी टाकून ठेवली जातात. ही जाळीच सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी जीवघेणी ठरतात. सरपडणारे प्राणी मुळात भित्रे असतात ते सहसा माणसांवर हल्ला करत नाहीत. त्यामुळे अनावश्यक ठिकाणी मासेमारीची जाळी लावू नये, ठेवू नये. असे आवाहन सर्पमित्र अक्षय खरे यांनी केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT