Rasalgad Mahipatgad Sumargad Forts Ratnagiri esakal
कोकण

Ratnagiri Forts : पर्यटनाच्या नावाखाली गडकिल्ल्यांवर धुडगूस; गडांचं पावित्र्य न राखता मुला-मुलींची हुल्लडबाजी

गडकिल्ले हे ऐतिहासिक वास्तू नसून पर्यटनस्थळ झाली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गडावर ट्रेंडच्या नावाखाली मुला-मुलींची नाचगाणी यासारखे प्रकार घडत आहेत. गडकिल्ल्यावर असं काही आढळून आल्यास त्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात येणार आहे.

खेड : सध्या पावसाळा सुरू झाला असून, पर्यटनासाठी अनेकजण किल्ल्यांना भेटी देत आहेत; मात्र किल्ल्यावर गेल्यावर गडाचे पावित्र्य न राखता त्या ठिकाणी हुल्लडबाजी करून धुडगूस घातला जात आहे; मात्र हा धुडगूस खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा वैभव सागवेकर यांनी दिला.

सध्या गडकिल्ल्यांवर होणारी पावसाळी पर्यटकांची गर्दी पाहून असं वाटतं, गडकिल्ले हे ऐतिहासिक वास्तू नसून पर्यटनस्थळ झाली आहेत. असे करताना आढळल्यास याद राखा, अशा शब्दांतही सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी इशारा दिलाय.

तालुक्यातील किल्ले रसाळगड (Rasalgad Fort), महिपतगड व सुमारगड असे किल्ले आहेत. अनेक पर्यटक किल्ल्यावर जात असतात. त्यांच्याकडून किल्ल्याचे पावित्र्य जपले जात नाही. पर्यटनाच्या नावाखाली धुडगूस घातला जातो. हे प्रकार निंदनीय असून या प्रकारांना पाठीशी घातले जाणार नाही. गडावरील मद्यपान व धुम्रपान भरपूर प्रमाणात वाढत आहे.

त्याचसोबत गडावर ट्रेंडच्या नावाखाली मुला-मुलींची नाचगाणी यासारखे प्रकार घडत आहेत. गडकिल्ल्यावर असं काही आढळून आल्यास त्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या गडकिल्ल्यांचा आदर वाटेल, असेच वागा. त्याचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT