Special search campaign out of school irregular and migrant children school stream kokan education marathi news 
कोकण

'विशेष शोध मोहीमेत पालकांनी सहकार्य करावे'

राधेश लिंगायत

हर्णे (रत्नागिरी) : शाळाबाह्य स्थलांतरित व अनियमित विशेष शोध मोहिमेअंतर्गत बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गावातील सर्व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन हर्णे ग्रामपंचायत सरपंच ऐश्वर्या धाडवे यांनी केले आहे.


शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम राबविणे बाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार आदेशित केले आहे. त्यानुसार दापोली तालुकास्तर समिती अध्यक्ष तथा तहसिलदार दापोली व गटविकास अधिकारी  दिघे यांच्या नेतृत्वाखाली समूह साधन केंद्राचे केंद्रप्रमुख ताजुद्दीन परकार यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामस्तर समितीचे गठण करण्यात आले. 

सदर समितीमध्ये  ग्रामपंचायतीच्या सरपंच ऐश्वर्या राजेंद्र धाडवे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर  अब्दुलरऊफ हजवानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नॅशनल हायस्कूल हर्णै तथा सभापती पं.स.दापोली, शाळा व्यवस्थापन समिती हर्णै नं.१ अध्यक्ष सुधीर बाबु राणे, उर्दु शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बदर गावकरकर , एन. डी. गोळे हायस्कूलचे अध्यक्ष दिपक खेडेकर यांची सह अध्यक्षपदी निवड करण्यात आली, पोलीस पाटील श्री प्रकाश वाघजे ,तलाठी- अमित शिगवण, ग्राम विकास अधिकारी- कृष्णा साळुंखे, मुख्याध्यापक - आर. टी. लेंडवे, आसिफ भाटकर, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता शिक्षण, तज्ञ बालरक्षक यांची सदस्यपदी निवड करण्यात आली तर सेवाज्येष्ठ मुख्याध्यापक - श्री. रविंद्र लक्ष्‍मण रुके (हर्णै जि. प. नं.१ शाळा) यांची सदस्य सचिव पदी निवड करण्यात आली. 

हेही वाचा- कोकण : देवा आलो तुझ्या चरणी म्हणत गणेशभक्तांनी घेतले फक्त कळसाचे दर्शन -
   
 १ मार्च २०२१ रोजी गावातील गजबजलेली बाजारपेठ येथून समितीचे अध्यक्ष तथा सरपंच ऐश्वर्या राजेंद्र धाडवे यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रप्रमुख श्री ताजुद्दीन परकार यांच्या  मार्गदर्शनाखाली व नियोजनानुसार शोध मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.सदर प्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच महेश पवार ,सुधीर राणे, बदर गावकरकर,  दीपक खेडेकर ,पंचक्रोशी अध्यक्ष अंकुश बंगाल,  आसिफ भाटकर, हर्णे एज्युकेशन सोसायटीच्या ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य  नजीर इनामदार ,अब्दुल सलाम आराई , पूजा पवार, एन.डी. गोळे हायस्कुलचे मुख्याध्यापक - तानाजी लेंडवे, अभिजीत पतंगे ग्रामपंचायत सदस्य - मेघना नागले, जयश्री दोरकुळकर, लतिका हवालदार पूनम पावसे व इस्माईल मेमन उपस्थित होते.

 गावातील १२ वाड्या ८ मोहल्ले, गजबजलेली ठिकाणे, मोठी बांधकामे, चिरेखाण, स्टेडियम परिसर, झोपड्या, हर्णै बंदर तसेच बागायती मध्ये राखण करण्यासाठी आलेल्या कुटुंबापर्यंत पोहोचून शाळाबाह्य बालकांचा शोध घेतला जाणार असून सर्व बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचा आमचा निर्धार असल्याचे सरपंच धाडवे यांनी सांगून पालकांना मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT