ST Accident On Chiplun Road Ratnagiri Marathi News  
कोकण

...अन् एसटी दरीत कोसळता - कोसळता वाचली

नागेश पाटील

चिपळूण ( रत्नागिरी ) - खेड तालुक्‍यातील भेलसई येथून चिपळूणला येणारी एसटी खोल दरीच्या बाजूस घसरली. बसची  बॉडी जमिनीला टेकल्याने बस खोल नदीत कोसळता-कोसळता वाचली. विद्यार्थ्यांसह सुमारे 30 ते 35 प्रवासी बसमध्ये होते. भेलसई येथील एका वळणावर सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. 

चिपळूण आगारातून चिपळूण शेल्डी बस सकाळी पाच वाजता सुटते. आंबडस, भेलसई, शेल्डी, गुणदेमार्गे पुन्हा भेलसईमार्गे चिपळूणला येते. नेहमीप्रमाणे ही बस चिपळूण आगारातून पाच वाजता सुटल्यानंतर आठ वाजता ती भेलसईत आली. भेलसई येथील एका वळणावर बस आली असता समोरून गुरे आडवी आल्याने चालकाने ब्रेक मारला.

बस घसरली अन्...

दरम्यान बस रस्त्याच्या कडेला घसरत गेली. या वळणाच्या रस्त्यालगत खोल दरीचा भाग आहे. रस्त्याच्या कडेला तीव्र उतार आहे. कडेला कसलीच संरक्षक भिंत नाही. रस्त्याच्या कडेला उतारावर घसरलेली बस एका झाडावर आदळली. शिवाय बसची खालील बॉडी जमिनीला टेकल्याने नशिबाने बस खोल उतारात गेली नाही. अचानकपणे एसटी वळणावरून खाली जात असल्याचे निदर्शनास येताच प्रवाशांना थंडीत घाम फुटला होता.

क्रेनने बस काढली बाहेर

सुदैवाने जमिनीला बॉडी टेकल्याने खोल नदीत बस जाता-जाता वाचली. अन्यथा अनेकांचा जीव धोक्‍यात आला होता. दरम्यान चिपळूण आगारास या घटनेची माहिती मिळताच आगारातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सकाळपासून एसटी बाहेर काढण्याचे काम सुरू होते. मात्र दुपारी क्रेन आल्यानंतर बस बाहेर काढण्यात आली. या घटनेत सुदैवाने कोणास दुखापत झाली नाही. मात्र मोठ्या घटनेतून बसमधील प्रवासी बचावले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT