The steps of eating at Rajapur are once again towards poultry kokan marathi news 
कोकण

राजापूरात खवय्यांची पावले पुन्हा एकदा पोल्ट्रीकडे ; गावठी कोंबड्यांचे दर झाले दुुप्पट-तिप्पट

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : चिकन खाण्यामुळे कोरोना व्हायरस होत असल्याचे सोशल मिडीयावरून पसरलेल्या अफवेतून नुकसानीमध्ये खाईमध्ये लोटलेला पोल्ट्री व्यवसाय आता हळूहळू सावरू लागला आहे. ऐन शिमगोत्सवापासून चिकन खाण्यापासून लांब गेलेल्या खवय्यांची पावले पुन्हा एकदा पोल्ट्रीकडे वळू लागली आहेत. त्यातून, प्रतिकिलो पन्नास रूपयांपर्यंत घसरलेला चिकनचा दर वधारून दुप्पट होताना 110 रूपयांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे गेले दोन महिने ठप्प झालेल्या पोल्ट्री व्यवसायामध्ये थोडी का असेना मात्र, उलाढाल होवू लागल्याने कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडलेल्या पोल्ट्री व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.

परजिल्ह्यातून विक्रीसाठी येणार्‍या कोंबड्या गेल्या काही महिन्यांपासून बंद झालेल्या आहेत. अशा स्थितीमध्ये राजापूर शहर आणि परिसरातील पोल्ट्री व्यवसायिकांकडे सद्यस्थितीमध्ये सुमारे दहा टक्के कोंबड्या विक्रीसाठी शिल्लक आहेत. त्या संपल्यानंतर मागणी असूनही विक्रीसाठी कोंबड्या नसल्याने व्यवसाय बंद करण्याची वेळ पोल्ट्री व्यवसायिकांवर येण्याची शक्यता आहे.  

व्यवसायिकांचे कंबरडे मोडले

चिकन खाण्यामुळे कोरोना होत असल्याच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरलेल्या अफवांचा पोल्ट्री व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होवून जानेवारी महिन्यापासून पोल्ट्री व्यवसायातील आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. त्यानंतर, सातत्याने खालावत चाललेल्या उलाढालीमध्ये पन्नास रूपयांपर्यंत घसरलेल्या दराची भर पडली. त्यातून, पोल्ट्री व्यवसायिकांचे पुरते कंबरडे मोडून गेले. नुकसानीच्या खाईत लोटलेल्या व्यवसायिकांना नोकरदारांचे पगार देणेही मुश्किल झाले. मात्र, चिकन खाण्यामुळे कोरोना होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने पुन्हा एकदा खवय्यांची पावले पोल्ट्रीकडे वळू लागली आहेत. सद्यस्थितीमध्ये चिकनच्या खरेदी-विक्रीतून फारशी उलाढाल होत नसली तरी, गेल्या काही महिन्यांतील नुकसानीची तूट भरून काढण्याच्यादृष्टीने मात्र, दिलासादायक आहे.  

चिकन खाण्याबाबतचे गैरसमज दूर झाले

कोरोनाच्या संभाव्य प्रादुर्भावामुळे लोकांनी चिकनकडे पाठ फिरवून पालेभाज्या खाण्याला अधिक प्राधान्य दिले होते. मात्र, चिकनमुळे कोरोना होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने लोकांचे चिकन खाण्याबाबतचे गैरसमज दूर झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पालेभाज्या खाणार्‍या खवय्यांकडून आता चिकनची मागणी होवू लागली आहे. शहरासह ग्रामीण भागामध्ये त्यांचे प्रमाण वाढले आहे. संचारबंदीमुळे ग्रामीण भागातील लोकांना शहरामध्ये येणे शक्य होत नसल्याने त्यांच्याकडून गावठी कोंबड्यांची मागणी वाढली आहे. त्यातून, गावठी कोंबड्यांचे दरही दुुप्पट-तिप्पट झाले आहेत.  

“ सोशल मिडियावरील चिकनबाबत पसरलेला गैरसमज आता हळूहळू दूर होवू लागला आहे. त्यातून, पुन्हा एकदा लोकांकडून चिकनची मागणी होवू लागली आहे. पूर्वीच्या तुलनेमध्ये म्हणावीतशी फारशी उलाढाल होत नाही. मात्र, जी उलाढाल होते ती निश्‍चितच दिलासादायक आहे. घटललेल्या प्रतिकिलो दरामध्ये वाढ झाली असली तरी, लोकांना पोल्ट्री व्यवसायिकांकडून होम डिलीव्हरी सर्व्हीस दिली जात आहे. ”

गनी याहू, पोल्ट्री व्यवसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा टेस्टी पनीर कचोरी, सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2025

Satara News: 'धरणग्रस्त आजीला सात वर्षांनंतर न्याय'; ‘मराठवाडी’तील प्रश्न प्रशासनाने सोडविला, देय रक्कम देण्याबाबत कार्यवाही

अग्रलेख : संतुलित निवाडा

SCROLL FOR NEXT