रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने (Ratnagiri District Administration)लसीकरणासाठी जिल्ह्याला नेमक्या किती लसी (Covid Vaccine) प्राप्त झाल्या, किती साठा उपलब्ध आहे, हे जाहीर करायला हवे. लसीकरणाबाबत प्रशासनाने पारदर्शक पद्धतीने काम करावे जेणेकरून, लोकांचे जीव धोक्यात न टाकता होत असलेली गैरसोय टाळता येईल, अशी स्पष्ट मागणी जिल्हाप्रशासनाला माजी खासदार ,भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे(Nilesh Rane)यांनी केले आहे.
Stock of available and remaining vaccines display diamond on nitesh rane
रत्नागिरी जिल्ह्याला कोरोनाने विळखा घातला असतानाच लसीकरणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. मेस्त्री हायस्कूल मधील 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणावेळी झालेली चेंगराचेंगरी आणि जिल्हा प्रशासनाचे कुचकामी ठरलेले नियोजन समोर आल्यानंतर निलेश राणे यांनी ही प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे.
जिल्हाप्रशासनाने या सर्व मोहिमेत जर पारदर्शकता ठेवली असती तर लोकांचे जीव धोक्यात आले नसते, असही ते म्हणाले. जिल्ह्यात लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी दिलेली लिंक उघडताक्षणी नोंदणी पूर्णतः झाल्याचे दिसून येते. लसी उपलब्ध असतील तर मग सलग लसीकरण का घेतले जात नाही? त्यामुळे यात कुठेतरी पाणी मूरत असल्याचा संशय बळावतो आहे.
याबाबत असंख्य नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. अशावेळी जिल्हाप्रशासनाने पारदर्शकता ठेऊन रत्नागिरी जिल्ह्यासाठी कोणत्या प्रकारच्या किती लसी शासनाकडून प्राप्त झाल्या, तालुक्यांमध्ये किती वाटप करण्यात आले, किती साठा उपलब्ध आहे, तसेच किती नागरिकांना लसी देण्यात आल्या, याची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर करावी. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय टाळता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.