कोकण

कोसुंबच्या जाधवांनी घेतले स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन

संदेश सप्रे

देवरूख - कोकणच्या लाल मातीत नवं पिकतं आणि ते विकलंही जातं हे सिद्ध केलं आहे कोसुंबमधील प्रगतिशील शेतकरी सुनील गोविंद जाधव यांनी. गेली ६ वर्षे आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या जाधव यांनी या वर्षी स्ट्रॉबेरीचे १२ टन उत्पादन घेतले आहे.

कोकणच्या लाल मातीतील स्ट्रॉबेरी कोकणातच विकता येते हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी यावर्षी १ टन ऊस, १ टन कलिंगडासह आंतरपीक म्हणून विविध प्रकारच्या पालेभाज्यांचेही विक्रमी उत्पादन घेतले.

जाधव हे गेली ३ वर्षे स्ट्रॉबेरीची शेती करतात. यावर्षी त्यांनी दीड एकरात स्ट्रॉबेरीची ३० हजार रोपे लावली. या रोपांचा मदरप्लॅंट कॅलिफोर्नियातून आयात केला जातो. त्यावर नर्सरीमध्ये प्रक्रिया करून एका प्लॅंटमधून साधारणतः १० रोपांची निर्मिती होते ते नंतर वाफ्यांमध्ये लावले जातात. एक रोप अर्धा ते एक किलो उत्पादन देते. लागवडीनंतर ४५ व्या दिवशी ते बाजारात जाते. फळे काढली जातात तशी नवीन फळे येतात. कोसुंबमधील त्यांच्या फार्मवर स्ट्रॉबेरीच्या स्वीट चार्ली, नॉबीला, कामारोजा, व्हिंटरडॉम अशा चार वेगवेगळ्या जातींच्या रोपांची लागवड असून प्रत्येक जातीची वेगळी चव इथे चाखायला मिळते. मुंबई, पुण्यासह, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गात याची विक्री होते. 

दहा वर्षांपूर्वी मी शेतीला सुरवात केली. गेल्या ४ वर्षात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. पुढील वर्षी याचे स्वरूप आणखी मोठे असणार आहे. आमच्या स्ट्रॉबेरीला चांगली मागणी आहे. पुढील वर्षीपासून कुणाला स्ट्रॉबेरी शेती करायची असेल त्यांना मोफत मार्गदर्शन व रोपे उपलब्ध करून देऊ. 
-सुनील गोविंद जाधव,
शेतकरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT