subsistence deprived of nature hurricanes in ratnagiri 
कोकण

‘निसर्ग’ने हिरावले जगण्याचे साधन ; एकीकडे विस्कटलेले घर दुरुस्त करण्याचे आव्हान तर दुसरीकडे आर्थिक घडी बसविण्यासाठी करावे लागत आहेत प्रयत्न....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी :  निसर्ग चक्रीवादळाने दापोली, मंडणगड तालुक्यातील हजारो कुटुंबांच्या उत्पन्नाचे साधन हिरावून घेतले आहे. रहाटगाडा चालवणार्‍या नारळ, पोफळींसह आंबा, काजूच्या 75 टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. कोट्यवधीचे नुकसान झाले. बागायतदार वीस वर्षे मागे गेला. बागायतदारांचे अर्थकारण बिघडले असून यातून सावरण्यासाठी बराच काळ लागणार आहे. बागांची साफसफाईसाठी हजारो रुपये खर्च करावे लागणार आहेत.


एकीकडे विस्कटलेले घर दुरुस्त करण्याचे आव्हान तर दुसरीकडे आर्थिक घडी बसविण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावे लागणार आहेत. दापोली तालुक्यात नुकसान झालेल्या गावांमधील बहुतांशी लोकांचा उदरनिर्वाह नारळ, पोफळी, आंबा, काजूच्या बागांवर अवलंबून आहेत. त्यातच मुरुड, कर्दे, कशेळी या किनारी भागातून रोठा सुपारी वाशी मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात विकली जाते. यामधून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. दापोली तालुक्यातील सुमारे चारशे हेक्टरवरील सुपारीचे नुकसान झाले . वर्षाला तीन ते चार हजार मण सुपारी बाजारात पाठवली जाते. नारळ बागांचीही हीच स्थिती आहे. हापूसचे सुमारे दीड ते दोन हजार हेक्टरचे नुकसान झाले असून वर्षाला सुमारे 20 ते 22 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

काजू उत्पादनामुळे कोटींच्या घरात नुकसानीचा आकडा जाणार आहे. चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वीची 75 टक्के झाडे भूईसपाट झाली आहेत.नारळ, सुपारीच्या बागा सफाईसाठी एकरी सात ते आठ हजार रुपये, तर आंब्याची बागेसाठी तोच खर्च 15 ते 17 हजार रुपयांपर्यंत येणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या मदतीतून घराची डागडुजीची कामे करणे सोपे जाणार आहे; मात्र भविष्यात उदरनिर्वाहासाठी विशेष योजनांचा हातभार आवश्यक आहे. रोजगार हमी योजना लागू केली तरीही त्यातून होणार्‍या लागवडीतून आठ ते दहा वर्षांनंतर उत्पन्न मिळणार आहे. तोपर्यंत बागायतदारांची ससेहोलपट सुरू राहणार आहे.

संकरित जातीची लागवड

बागायतदारांना सावरण्यासाठी ऑरेंज डॉर्फ, टी क्रॉस डी या सारख्या संकरित आणि कमी कालावधीत उत्पादन देणार्‍या जातींच्या लागवडीवर भर दिला पाहिजे. ऑरेंज डॉर्फ ही कमी उंचीची आणि शहाळ्यांसाठी प्रसिद्ध जात आहे. तर टी क्रॉस डी ही संकरित जात नारळाचे उत्पादन देणारी आहे. त्यातून आठ ते दहा वर्षात उत्पादन मिळते.

निसर्ग वादळामुळे किनारी भागातील बागायतदारांची घडी विस्कटली आहे. आमची तिसरी पिढी या झाडांचे उत्पन्न घेत होती. नुकसानामुळे आम्ही वीस वर्षे मागे गेलो आहोत. शिल्लक राहिलेल्या झाडातून उत्पादन मिळण्यास दोन वर्षे जातील.
----रवींद्र जोशी, मुरुड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 317 अंकांनी वाढला; ऑटो-फार्मामध्ये खरेदी, कोणते शेअर्स तेजीत?

'आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा अतरंगी टिझर प्रदर्शित; प्रदर्शनाची तारीखही समोर

Sangli Children : चौदा महिन्यांचा श्रवण व अडीच वर्षांचा करण खेळताना पाण्याच्या टाकीत डोकावले अन्..., आई घरकामात व्यस्त घडलं भयानक

चाहत्याच्या वागण्यामुळे राजामौली संतापले!

Heatwave Survey : ‘हिवताप’ सर्वेक्षण सातारा जिल्ह्यात गतिमान; डेंगीचे ५९, मलेरियाचे ३९, तर चिकनगुनियाचे १७ रुग्‍ण आढळले

SCROLL FOR NEXT